शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या बजेटसाठी आढावा बैठक

By admin | Updated: February 12, 2015 13:44 IST

नवनियुक्त आयुक्त सुशील खोडवेकर यांनी बुधवारी सर्व विभाग- प्रमुखांची बैठक घेऊन पुढील अर्थसंकल्पावर चर्चा केली.

 नांदेड : महापालिकेचा पुढील वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या असून नवनियुक्त आयुक्त सुशील खोडवेकर यांनी बुधवारी सर्व विभाग- प्रमुखांची बैठक घेऊन पुढील अर्थसंकल्पावर चर्चा केली. एप्रिल २0१५ ते मार्च २0१६ या वर्षातील अर्थसंकल्पाच्या तयारीला प्रशासनाकडून गती देण्यात येत आहे. मार्चअखेर हा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात येईल. त्यापूर्वी स्थायी समिती सभेत प्रशासनाकडून हा अर्थसंकल्प मंजुरीसाठी ठेवला जाईल. प्रशासकीय स्तरावरील अर्थसंकल्प तयार करताना त्यातील तरतुदी व निधीचा ताळमेळ घालण्यासाठी आयुक्तांकडून सूचना देण्यात आल्या. दरम्यान, महसुली उत्पन्न व खर्चाच्या नियोजनासोबत शहरातील मूलभूत सेवा सुविधा पुरविण्यासाठी निधीची तरतूद करत सन २0१४- १५ चा १ हजार ३ कोटी ४९ लाखांचा अर्थसंकल्प मनपा प्रशासनाने लोकसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी स्थायी समितीसमोर सादर केला होता. मात्र या अर्थसंकल्पाला सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळण्यापूर्वीच आचारसंहितेत अडकला होता. त्यामुळे प्रशासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर अभ्यास करण्यास पदाधिकार्‍यांना मोठा कालावधी मिळाला होता. या वेळेत अर्थसंकल्पात नवीन विषय मांडण्यास संधी असल्याने तत्कालीन सभापती उमेश पवळे यांनी जागरूक नागरिक, अभ्यासक, पत्रकार यांच्याकडून सूचना मागविल्या होत्या. त्यास प्रतिसाद मिळाला होता. परंतु हा अर्थसंकल्प चार महिन्यानंतर मंजूर झाला होता. यंदा अर्थसंकल्प वेळेवर सादर करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. गतवर्षी उत्पन्न वाढीसाठी नवे पर्याय सुचवून खर्चात काटकसर करण्याचा तसेच कोणताही अतिरिक्त करवाढ प्रस्तावित नसलेला अर्थसंकल्प मनपा प्रशासनाने सादर केला होता.दरम्यान, दरवर्षी अर्थसंकल्प वेगवेगळ्या कारणामुळे लटकला जातो. यंदातरी, वेळेत बजेटला मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. /(प्रतिनिधी)