शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

बायपास मोजणीला शेतकºयांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 00:37 IST

नागपूर ते सोलापूर या प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग क्रं़३६१ च्या बायपास मोजणीसाठी आलेल्या महामार्ग प्राधिकरणाच्या कर्मचा-यांना शनिवारी शेतक-यांच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले़ त्यामुळे प्राधिकरण कर्मचा-यांनी मोजणी न करताच काढता पाय घेतला़

ठळक मुद्देमाळाकोळी राष्ट्रीय महामार्ग : महामार्ग प्राधिकरणाच्या कर्मचाºयांचा काढता पाय

लोकमत न्यूज नेटवर्कमाळाकोळी : नागपूर ते सोलापूर या प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग क्रं़३६१ च्या बायपास मोजणीसाठी आलेल्या महामार्ग प्राधिकरणाच्या कर्मचा-यांना शनिवारी शेतक-यांच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले़ त्यामुळे प्राधिकरण कर्मचा-यांनी मोजणी न करताच काढता पाय घेतला़दोन वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या नागपूर ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या जमीन अधिग्रहणाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. सदरील राष्ट्रीय महामार्ग गट ग्रा.प. माळाकोळी या गावातून पूर्वीच्या राज्य मार्गाप्रमाणे मोजणी करण्यात आला होता़ मात्र गावातील इमारतीचे नुकसान पाहता गावकºयांनी तीव्र विरोध केला़ माळाकोळी येथील ग्रामपंचायतीने बायपासची मागणी केली होती़ या ठरावाचा विचार करून महामार्ग प्राधिकरणानी माळाकोळीला ३ कि.मी. चा बायपास मंजूर केला़ तसेच ५ जानेवारी २०१८ ला वर्तमानपत्रात बायपासची जाहिरात प्रकाशित केली होती़दरम्यानच्या काळात गावामध्ये महामागार्साठी दोन गट तयार झाले.एक गट महामार्ग गावातून नेण्यासाठी प्रयत्नशील होता, तर दुसरा गट बायपाससाठी आग्रही होता.जाहिरात प्रकाशित केल्या नंतर दोन महिण्यानी महामार्ग प्राधिकरणाने कर्मचारी बायपासच्या मोजणीसाठी ९ मार्च रोजी माळाकोळी येथे पाठवले़ बायपासचा मार्ग पहिल्या गटाच्या लोकांना मान्य नसल्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. शेतकºयांनी मोजणीसाठी आलेल्या कर्मचाºयांना कडाडून विरोध केला. आमच्या मालकीची जमीन सरकारला देणार नाही़ या रस्त्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे़ पूर्वीच्या सर्वेनुसारच महामार्ग होऊ द्या, अशा घोषणा देत शेतमालक व महिला आक्रमक झाल्याने कर्मचाºयांनी काढता पाय घेतला.बायपाससाठी घेतलेला माळाकोळी ग्रामपंचायतीचा ठराव बोगस असल्याचे आरोप सदरील शेतकºयांकडून करण्यात आला असून ठरावाची चौकशी करून वरिष्ठानी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे. यावेळी संजय पवार, सुरेखा पवार, तुकाराम पवार, विश्वनाथ पवार,सिद्राम केंद्रे, संभाजी तिडके, सतीश कुलकर्णी यांच्यासह महिला व शेतकरी उपस्थित होते़