शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडमधील आयुर्वेदिक महाविद्यालयातील अ‍ॅन्टीरॅगिंग समितीचा अहवाल गुलदस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 00:15 IST

येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात २५ जानेवारी रोजी घडलेल्या रॅगिंग प्रकरणाची चौकशी अ‍ॅन्टीरॅगिंग समितीवर सोपवली आहे़ या समितीचा तपास गुलदस्त्यातच असून याप्रकरणी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ़श्यामकुंवर यांनी देखील मौन बाळगले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात २५ जानेवारी रोजी घडलेल्या रॅगिंग प्रकरणाची चौकशी अ‍ॅन्टीरॅगिंग समितीवर सोपवली आहे़ या समितीचा तपास गुलदस्त्यातच असून याप्रकरणी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ़श्यामकुंवर यांनी देखील मौन बाळगले आहे़शहरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात फ्रेशर्स पार्टीचे आयोजन करण्यासाठी मंगळवारी रात्री सिनिअर विद्यार्थ्यांनी द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना वसतीगृहातील खोलीवर बोलावले़ यानंतर त्यांची रॅगिंग केली़ तसेच मारहाणदेखील केली़ याप्रकरणाची वजिराबाद पोलिसांनी नोंददेखील घेतली आहे़ दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी महाविद्यालय बंद केले़ त्यानंतर सदर प्रकरण चौकशीसाठी अ‍ॅन्टीरँगिग समितीकडे देण्यात आले होते़ परंतु, गुरूवारी रात्री उशिरापर्यंत या समितीचा अहवाल प्राप्त झाला नव्हता़ त्यामुळे रॅगिंग झालेल्या विद्यार्थ्यांना कधी न्याय मिळेल, असा प्रश्न विद्यार्थ्यांमधून उपस्थित होत आहे़ तर याप्रकरणी अधिष्ठाता डॉ़शामकुंवर यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता त्यांनी समितीच्या अहवालासंदर्भात बोलण्याचे टाळले़दरम्यान, सदर प्रकरणात एका राजकीय पक्षाच्या माध्यमातून मध्यस्थी करुन प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा महाविद्यालयाच्या परिसरात आहे. मात्र या बाबत कोणीही उघडपणे बोलण्यास तयार नसल्याचे गुरुवारी दिसून आले.अ‍ॅन्टीरॅगिंग समितीच्या अहवालाची आम्ही वाटत पाहत आहोत.सदर समितीचा अहवाल प्राप्त होताच या प्रकरणात कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित फस्के यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.