शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यावर पुन्हा अवकाळीचे ढग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:47 IST

जिल्हा प्रशासनाने येत्या शुक्रवारी आणि शनिवारी जिल्ह्यात गारपिटीसह अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे. सध्या रबी ज्वारी व हरभरा पिकांची काढणी बहुतांश ठिकाणी अंतिम टप्प्यात असून गहू, मका व करडई पिकांची काढणीही प्रगतीपथावर असतानाच अवकाळीचे ढग जमा झाल्याने शेतकऱ्यांना काळजी घ्यावी लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्हा प्रशासनाने येत्या शुक्रवारी आणि शनिवारी जिल्ह्यात गारपिटीसह अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे. सध्या रबी ज्वारी व हरभरा पिकांची काढणी बहुतांश ठिकाणी अंतिम टप्प्यात असून गहू, मका व करडई पिकांची काढणीही प्रगतीपथावर असतानाच अवकाळीचे ढग जमा झाल्याने शेतकऱ्यांना काळजी घ्यावी लागणार आहे.भारतीय हवामान खात्याच्या सूचनेवरुन जिल्हाधिकारी कार्यालयाने इशारा दिला आहे. त्यानुसार ६ आणि ७ एप्रिल या दिवशी जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गुरुवार, ५ आणि ६ एप्रिल रोजी जिल्ह्यात कमाल तापमान ४१ अंशांच्या पुढे जाण्याचा अंदाज असून शनिवारी जिल्ह्यातील वातावरण अंधूक राहण्याची शक्यता आहे. या वातावरणात ७ एप्रिल रोजी बदल होत तापमानाचा पारा घटण्याची शक्यता असून १० एप्रिलपर्यंत हे कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअसवर जाईल. या दिवसांत अंधूक वातावरणाची शक्यता व्यक्त करीत जिल्ह्याच्या काही भागात गडगडाटी वादळे येण्याचा इशाराही भारतीय हवामान खात्याच्या निर्देशावरुन जिल्हा प्रशासनाने दिला आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांसह मनपा आयुक्त आणि सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकºयांनी पावसाचा अंदाज असल्याने कापून ठेवलेल्या पिकांची काळजी घ्यावी. या बरोबरच विजा चमकत असताना झाडाखाली न थांबता सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, अशा सूचना दिल्या आहेत. सध्या जिल्ह्यातील शेतकरी रबी ज्वारीसह गहू व मका पिकांची काढणी करीत आहेत. या बरोबरच हरभरा आणि करडई पिकांची काढणीही सुरु आहे. अशा स्थितीत अवकाळी पावसाची शक्यता वर्तविल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. जिल्हा प्रशासनाने नुकतेच जिल्ह्यातील १ हजार १६८ गावे दुष्काळसदृश्य असल्याचे जाहीर केले आहे. त्यातच अवकाळीचे ढग दाटल्याने शेतकºयांना सतर्कता बाळगावी लागणार आहे.फेब्रुवारीत नऊ तालुक्यांना बसला होता फटकाफेब्रुवारीमध्ये १२ आणि १३ रोजी जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला होता. १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या गारपिटीचा तडाखा नांदेडसह कंधार, माहूर, किनवट, हदगाव, धर्माबाद, बिलोली, हिमायतनगर आणि नायगाव या नऊ तालुक्यांना सोसावा लागला होता. या तालुक्यांतील ४५२ हून अधिक गावांत गारपीट झाली होती. या गारपिटीमुळे २९ हजार ६३५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते.फेब्रुवारीमध्ये शेतकºयांना अवकाळी पावसाचा फटका सोसावा लागल्यानंतर आता पुन्हा अवकाळीचे ढग घोंघावू लागल्याने शेतकºयांनी दक्षता घेण्याची गरज आहे.

टॅग्स :HailstormगारपीटNandedनांदेड