प्रधानमंत्री पीकविमा योजना व फळ पीकविमा योजना या दोन्ही योजनांतील लाभार्थी शेतकर्यांच्या खात्यामध्ये शासन निर्णयानुसार आठ दिवसांमध्ये २५ टक्के नुकसानीची भरपाई देणारी अधिसूचना काढून उर्वरित नुकसानभरपाई पीक कापणी प्रयोगानंतर द्यावी, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये मागील पंधरा दिवसांपासून सतत अतिवृष्टी होत असल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
चौकट.....
शेतातील माती वाहून जाणे, पीक वाहून जाणे, पीक अतिपाण्यामुळे करपणे असे नुकसान सोयाबीन, ज्वारी, उडीद, मूग या पिकांचे झालेले आहे. तसेच फळपीक योजनेंतर्गत अनेक फळपिकांच्या झाडांचेसुद्धा नुकसान झाले आहे. विशेषतः केळी, आंबा, मोसंबी, संत्री या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना तत्काळ प्रधानमंत्री पीकविमा योजनेतून मदत देऊन नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी प्रा. शिवाजी मोरे सोनखेडकर यांनी केली आहे.