शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला सासरी पाठवण्यास नकार; जावयाने सासऱ्याच्या छातीत वीट मारून केली हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 15:15 IST

लग्नानंतर सासरकडून शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून महिला माहेरी आली होती

ठळक मुद्देपत्नीला नांदावयास पाठवण्यास नकार दिल्याने झाला वाद

मरखेल/हणेगाव (जि. नांदेड) :  पत्नीस नांदावयास का पाठवत नाही? असे म्हणून जावयाने रमेश पांढरे (५५) या आपल्या सासऱ्याचा निर्घृण खून केला. याप्रकरणी जावई व त्याच्या वडिलांविरुद्ध मरखेल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात येऊन उपरोक्त दोघांना पोलिसांनी अटक केली. ही घटना बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास मानूर येथे घडली. 

मानूर येथील रमेश शामराव पांढरे यांची मुलगी सुरेखा हिचा विवाह बेम्बरा येथील उमाकांत मुरलीधर सोलंकर याच्याशी दहा वर्षांपूर्वी झाला होता. दरम्यान, हत्येप्रकरणी सरपंच लचमारेड्डी यांनी मरखेल पोलीस स्टेशनला याविषयी माहिती दिली. हणेगाव येथे मयताचे शवविच्छेदन झाल्यानंतर उपरोक्त दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मयताची पत्नी चंद्रकलाबाई रमेश पांढरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

वादातून जावयाने छातीवर मारली वीटलग्नानंतर सासरकडून शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून मागील काही महिन्यांपासून सुरेखा माहेरी राहत होती. बुधवारी सुरेखाचा पती उमाकांत व सासरा मुरलीधर सोलंकर हे सुरेखाच्या माहेरी आले व तिला सासरी पाठवून देण्याचा आग्रह करू लागले. सुरेखाच्या वडिलांनी अमावास्या झाली की पाठवतो, असे सांगितल्यानंतर जावई व सासऱ्यात वाद झाला. जावई व त्याच्या वडिलाने सासऱ्यास मारहाण व शिवागीळ केली. सासऱ्याच्या छातीवर जावयाने अंगणातील वीट घेऊन मारल्याने रमेश पांढरे हे गंभीर जखमी झाले. त्यांना हणेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. 

टॅग्स :MurderखूनNandedनांदेड