शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

बीओटीवरून नांदेड महापालिकेत रणकंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 00:40 IST

शहरातील वजिराबाद भागातील तरोडेकर मार्केटचा बीओटी तत्वावर विकास करण्याचा ठराव महापालिकेच्या शुक्रवारी होणारी सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला आहे.

ठळक मुद्देस्थायी समिती व प्रशासन आमने-सामने

नांदेड : शहरातील वजिराबाद भागातील तरोडेकर मार्केटचा बीओटी तत्वावर विकास करण्याचा ठराव महापालिकेच्या शुक्रवारी होणारी सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला आहे. याच बीओटी विषयावरुन महापालिकेत रणकंदन सुरू झाले असून स्थायी समिती व महापालिका प्रशासन समोरासमोर आले आहेत.वजिराबाद भागातील तरोडेकर मार्केटचा बीओटी तत्वावर विकास करण्याचा ठराव २७ फेब्रुवारी २०१७ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर झाला आहे. या कामासाठी महापालिकेने निविदा मागवल्या असता त्यामध्ये १४ नोव्हेंबर २०१८ रोजी पात्र ठरलेल्या ४ कंत्राटदारांचे प्रिमिअर दर उघडण्यात आले. त्यात विश्वकर्मा इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.ने ३ कोटी २१ लाख, शारदा कन्स्ट्रक्शनने ३ कोटी ४५ लाख, सन्मान बिल्डकॉन प्रा.लि.ने ३ कोटी ५१ लाख आणि राज डेव्हलपर्सने सर्वाधिक ५ कोटी १ लाखांचा प्रिमिअर यांचा आहे. या कामासाठी महापालिकेने ३ कोटी ४७ लाखांचा प्रिमिअर अपेक्षित ठेवला होता. अपेक्षेपेक्षा ४४ टक्के जादा दराचे प्रिमिअम राज डेव्हलपर्सने देण्याची तयारी दर्शविली आहे.ही निविदा प्रक्रिया मंजूर करण्यासाठी महापालिकेच्या ३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला आहे.हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे ठेवताच येत नाही, असा दावा स्थायी समितीने केला आहे. स्थायी समितीच्या अधिकारातील विषय सर्वसाधारण सभेकडे पाठवून स्थायी समितीच्या अधिकारावर गंडांतर आणले जात आहे. त्यामुळे हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे न ठेवता योग्य त्या सुधारणा करुन तो स्थायी समितीच्यापुढे मान्यतेसाठी ठेवावा, असा ठराव स्थायी समितीने घेतला होता. मात्र शुक्रवारी होणाºया सर्वसाधारण सभेपुढे बीओटी प्रस्तावाला मान्यता देण्याचा ठराव ठेवण्यात आला आहे.स्थायी समिती आणि प्रशासनातील हा वाद सुरु असताना काँग्रेसचे नगरसेवक बापूराव गजभारे यांनी बीओटी प्रस्ताव रद्द करण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे.विशेष म्हणजे शुक्रवारीच स्थायी समितीची सकाळी ११ वाजता बैठक होणार आहे तर सर्वसाधारण सभा दुपारी ३ वाजता होणार आहे.स्थायी समितीच्या बैठकीत दलित वस्ती कामांना मान्यता देण्याचे सहा विषय ठेवण्यात आले आहेत. ज्यादा दराने हे प्रस्ताव आले आहेत. त्याचवेळी बीओटी मान्यता देण्याच्या संदर्भात प्रशासनाने स्थायी समितीकडे प्रस्ताव सादर न करता सर्वसाधारण सभेपुढे ठेवल्याच्या विषयावरही वादळी चर्चा अपेक्षित आहे. सत्ताधारी आणि स्थायी समिती सदस्य सर्वसाधारण सभेत बीओटीच्या विषयावर काय भूमिका घेतात याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.स्थायी समितीवर होणार आठ सदस्यांची निवडस्थायी समितीचे आठ सदस्य एक वर्षाचा कार्यकाळ संपल्यामुळे निवृत्त झाल्या आहेत. १६ पैकी ८ सदस्य चिठ्ठीद्वारे निवृत्त झाले. रिक्त झालेल्या आठ जागांवर सदस्य निवड शुक्रवारी होणाºया सर्वसाधारण सभेत केली जाणार आहे. ही स्थायी समितीवर कोणते आठ सदस्य जातील याकडे लक्ष लागले आहे. काँग्रेसचे आठ सदस्य स्थायी समितीवर नव्याने जाणार आहेत. अंतिम नावे शुक्रवारच्या सभेत घोषित करण्यात येतील.

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिका