शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 19:49 IST

याबाबत कुठलीही तक्रार आली नसल्याचे महाविद्यालय प्रशासनाचे म्हणणे आहे़

ठळक मुद्देमहाविद्यालय प्रशासनाचा मात्र इन्कार

नांदेड : विष्णुपुरी येथील डॉ़ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात वरिष्ठ विद्यार्थिनींकडून प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींची रॅगिंग केली जात असल्याचे उघडकीस आले आहे़ स्नेहसंमेलनाची तयारी आटोपल्यानंतर रात्री तीन वाजेपर्यंत प्रथम वर्षांच्या मुलींना वसतिगृहात उभे राहण्यास सांगण्यात येत आहे़ गेल्या चार दिवसांपासून हा प्रकार सुरु आहे़ परंतु याबाबत कुठलीही तक्रार आली नसल्याचे महाविद्यालय प्रशासनाचे म्हणणे आहे़

वैद्यकीय महाविद्यालयात मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह आहे़ येत्या काही दिवसांत महाविद्यालयात स्नेहसंमेलन घेण्यात येणार आहे़ त्यासाठी ग्रंथालयाच्या वरील मजल्यावर विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तयारी करीत आहेत़ रात्री अकरा वाजेनंतर ते सर्व जण आपापल्या वसतिगृहात परत जातात़ परंतु गेल्या चार दिवसांपासून वसतिगृहात प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींना रात्री तीन वाजेपर्यंत उभे करुन ठेवण्यात येत आहे़, अशी माहिती हाती आली आहे़ वैद्यकीय महाविद्यालयात होणाऱ्या त्रासाची एका विद्यार्थिनीने तक्रारही केली होती़ परंतु तिची समजूत घालण्यात आल्याचे समजते़या प्रकाराची चौकशी करणार सध्या स्नेहसंमेलनाची तयारी सुरु आहे़ ग्रंथालयाच्या वरील भागात विद्यार्थी तयारी करीत आहेत़ त्यानंतर रात्री अकरा वाजता ते वसतिगृहात परत जातात़ परंतु वसतिगृहात असा काही प्रकार होत असेल असे वाटत नाही़ अद्याप तरी तशी तक्रार नाही़ परंतु वसतिगृहातील मुलींशी बोलून चौकशी करणार आहे़ - डॉ़ एस़ आऱ वाकोडे, प्रभारी अधिष्ठाता

स्नेहसंमेलनाची तयारी सुरु आहे़ रात्री १२ वाजेपर्यंत विद्यार्थी सराव करतात़ वसतिगृहात रॅगिंगचा प्रकार झाला नाही़ तुम्हाला माहिती कोणी दिली? रॅगिंग होत असल्यास मुलींनी माझ्याकडे तक्रार केली असती़- सुधा कानखेडकर, वॉर्डन

टॅग्स :Medicalवैद्यकीयStudentविद्यार्थीNandedनांदेड