दिवसभरात एका मेडिकलमधून २५ ते ३०ऑक्सिमीटरची विक्री होत आहे. तसेच एन ९५ मास्कची मागणी वाढल्याने या मास्कचा तुटवडा निर्माण झाला आहे. शासनाने या मास्कचे दर निश्चित केले असून, एका मास्कची किंमत ३० रुपये आहे. हे मास्क मेडिकलमध्ये मिळत नाही. शिल्लक नाही, असे उत्तर दिले जाते. इतर कंपन्यांचेही मास्क बाजारात दाखल झाले असून, या मास्कला फारशी मागणी नसल्याचे दिसत आहे.
चौकट : सध्या नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठी असून, शहरातील रुग्णालयात बेडसाठी नातेवाइकांना धावपळ करावी लागत आहे. त्यामुळे बाधित झालेले, परंतु लक्षणे नसलेले रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. अशा वेळी ऑक्सिमीटरची गरज भासत आहे. परंतु, ऑक्सिमीटरच्या किमती मनमानी वाढल्याने नागरिकांना ऑक्सिमीटर विकत घेणे परवडत नाही.