शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

वीज ग्राहकांना मिळणार प्रिपेड मीटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:51 IST

नांदेड: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून ग्राहकांना प्रिपेड सुविधा देण्यात येणार आहे़ त्यासाठी नांदेड परिमंडळाला पुढील काही दिवसांत ९ हजार प्रिपेड मीटर उपलब्ध होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून ग्राहकांना प्रिपेड सुविधा देण्यात येणार आहे़ त्यासाठी नांदेड परिमंडळाला पुढील काही दिवसांत ९ हजार प्रिपेड मीटर उपलब्ध होणार असल्याची माहिती नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता अविनाश पाटोळे यांनी पत्रपरिषदेत दिली़ नांदेड परिमंडळाअंतर्गत येणाऱ्या नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील ग्राहक, वीजचोरी, वीजगळती, दुरूस्ती तसेच ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा आदी कामासंदर्भात मुख्य अभियंता पाटोळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ग्राहकांना सेवा सुलभ व्हावी म्हणून मोबाईल अ‍ॅप, आनलाईन बिलिंग, तक्रारी आदींची सुविधा उपबल्ध करून दिली आहे़ यापेक्षाही एक पाऊल पुढे टाकत आगामी काळात प्रिपेड मीटरद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार असल्याचे पाटोळे यांनी सांगितले़ ते म्हणाले, ग्राहकांना प्रिपेड मीटर दिले जाईल़ यामध्ये जेवढ्या रकमेचे रिचार्ज असेल तेवढा वीज वापर ग्राहक करू शकतील, त्याचबरोबर रिचार्ज संपण्यापूर्वी सूचनादेखील मिळेल़ रिडींगच्या तक्रारी कमी होतील तसेच ग्राहकांकडून विजेची पर्यायाने त्यांची आर्थिक बचत होईल, असा विश्वास मुख्य अभियंता पाटोळे यांनी व्यक्त केला़ दरम्यान, वीज रिडींग घेण्यासंदर्भात ग्राहकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन नांदेड परिमंडळाच्या वतीने मीटर रीडिंग एजन्सीने योग्य रीडिंग घेतले आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी नांदेडसह परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात क्रॉसचेक रीडिंग मोहीम राबविण्यात येत असल्याचे पाटोळे यांनी सांगितले़ यामध्ये दोषी आढळून आलेल्या रीडिंग एजन्सीवर कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले़ महावितरणने पावसाळापूर्व कामे केली आहेत़ परंतु, इन्सुलेटर फुटून, झाड्याच्या फांद्या पडून तसेच शहरातील होर्डिंग्ज लाईनवर पडल्याने शहरात पाऊस सुरू असताना वीजपुरवठा खंडित होत आहे़ त्यामुळे होर्डिंग्ज लावताना वीजतारेपासून दूर लावावे, असे आवाहन पाटोळे यांनी केले़ दरम्यान, नांदेडला शासनाकडून मिळालेल्या १०६ कोटी रूपयांतून कृषी पंपाच्या ऊर्जीकरणाचे काम करण्यात आले़ यानंतर मिळालेल्या ६० कोटी रूपयांचा वापरदेखील कृषीपंपासाठी करण्यात आला़ येणाऱ्या काळात गावठाण आणि शेतातील वीज वेगवेगळ्या फिडरवरून दिली जाणार आहे़ त्यामुळे गावामध्ये २४ तास वीजपुरवठा होईल, असेही त्यांनी सांगितले़ सध्या नांदेड परिमंडळात एकूण १० लाख १४ हजार ७७२ वीजग्राहक आहेत़ यामध्ये घरगुती वापर करणारे ६ लाख ५५ हजार ५५३, वाणिज्यिक ग्राहक-४८ हजार ६६२ तर ११ हजार ८० औद्योगिक ग्राहक आहेत़