शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
4
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
5
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
6
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
7
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
8
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
9
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
10
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
11
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
12
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
13
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
14
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
15
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
16
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
17
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
18
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
19
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू

प्लास्टिक बंदीसाठी नांदेड जिल्हा प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 00:47 IST

प्लास्टिकपासून बनविल्या जाणाऱ्या पिशव्यांसह थर्माकॉलपासून बनविण्यात येणाºया विविध वस्तुंच्या उत्पादन, वापर, साठवणूक, वितरणासह विक्रीवर निर्बंध घालण्यात आले असून या आदेशाची शनिवारपासून राज्यभरात अंमलबजावणी होणा आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनही कारवाईसाठी सज्ज झाले असून महानगरपालिकेने यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय सहा जप्ती पथकांची नियुक्ती केली आहे.

ठळक मुद्देउत्पादन, वापर, साठवणुकीवर बंदी : कारवाईसाठी मनपाची सहा पथके कार्यान्वित

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : प्लास्टिकपासून बनविल्या जाणाऱ्या पिशव्यांसह थर्माकॉलपासून बनविण्यात येणाºया विविध वस्तुंच्या उत्पादन, वापर, साठवणूक, वितरणासह विक्रीवर निर्बंध घालण्यात आले असून या आदेशाची शनिवारपासून राज्यभरात अंमलबजावणी होणा आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनही कारवाईसाठी सज्ज झाले असून महानगरपालिकेने यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय सहा जप्ती पथकांची नियुक्ती केली आहे.महाराष्टÑ विघटनशील व अविघटनशील कचरा (नियंत्रण) कायदा २००६ मधील अधिकाराचा वापर करुन राज्य शासनाने प्लास्टिक पिशव्यांच्या उत्पादन व वापरावर बंदी घातली आहे. यानुसार प्लास्टिक किंवा थर्माकॉलपासून बनविण्यात येणाºया वस्तू, यामध्ये प्लास्टिकचे कप, प्लेट्स, ग्लास, ताटे, वाटी, चमचे, फ्लेक्स यासह बॅनर्स, तोरण, ध्वज, प्लास्टीक सिट्स याबरोबरच प्लास्टिक वेस्टर्न असलेल्या वस्तुंच्या उत्पादन, वापर, साठवणूक, वितरण, विक्री इत्यादींवर बंदी घातली आहे. जिल्ह्यातील शासकीय, अशासकीय संस्था, क्रीडा संकुल, चित्रपट व नाट्यगृहे, औद्योगिक घटक, समारंभाचे हॉल यासह धार्मिक स्थळे, धार्मिक संस्था, हॉटेल, धाबे, दुकानदार, मॉल्स, केटरस, फेरीवाला आदींवर बसस्थानके, रेल्वे स्थानके तसेच इतर सर्व सार्वजनिक ठिकाणी ही बंदी शनिवार, दि. २३ जूनपासून लागू करण्यात आली आहे.राज्य शासनाच्या या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनानेही पुढाकार घेतला असून महानगरपालिकेच्या वतीने प्लास्टिक निर्मित करणाºया, विकणाºया तसेच वापरणाºयाविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी मनपाने क्षेत्रिय कार्यालयनिहाय जप्ती पथकांची स्थापना केली आहे. ही पथके वरील बंदी घातलेल्या वस्तुंचा वापर करताना अथवा हताळताना आढळल्यास त्यांच्याविरुद्ध शासन अधिसूचनेनुसार दंडात्मक कारवाई करणार आहे. या निर्बंधाचे पालन न करणाºयाविरुद्ध पथकाच्या वतीने पहिल्या अपराधासाठी ५ हजार रुपये, दुसºया अपराधासाठी १० हजार रुपये आणि नंतरच्या अपराधासाठी ३ महिन्यांपर्यंतच्या कारावासाची व रुपये २५ हजार पर्यंतच्या द्रव्य दंडाची शिक्षा करण्यात येणार आहे.---अशी आहेत क्षेत्रिय कार्यालयनिहाय जप्ती पथकेपथक क्र. १- संजय जाधव (सहा. आयुक्त), विश्वनाथ कल्याणकर, आनंद गायकवाड, संजय ज्ोगतरक. पथक क्र. २- सुधीर इंगोले (सहा. आयुक्त), विजय वाघमारे, शेख नईम, गणेश मुदिराज, रतन रोडे. पथक क्र. ३-अविनाश अटकोरे (सहा. आयुक्त), एस. पी. पाशमवाड, बालाजी देसाई, प्रियंका एंगडे. पथक क्र. ४-शिवाजी डहाळे (सहा. आयुक्त), वसीम तडवी, अतिक अन्सारी, गोविंद थेटे, गणेश शिंगे, जिलानी पाशा. पथक क्र. ५-मिर्झा फरतुल्ल बेग (सहा. आयुक्त), सय्यद जाफर, एम. स. समी, दयानंद कवले, यशवंत ढगे. पथक क्र. ६-पंडित जाधव (सहा. आयुक्त), किशन वाघमारे, रुपेश सरोदे.---निरुपयोगी प्लास्टिकमधून साकारणार रस्तेराज्य शासनाने प्लास्टिक बंदी लागू केली आहे. या बंदीमुळे पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यास मोठा हातभार लागणार आहे. प्लास्टिक वस्तू तसेच औद्योगिक वापरात असलेले प्लास्टीक आता निरुपयोगी होणार आहे. हे निरुपयोगी प्लास्टिक रस्ता डांबरीकरणाच्या कामात कोरड्या पद्धतीद्वारे वापरल्यास डांबरीकरणाची कामे कमीत कमी किमतीत चांगल्या गुणवत्तेची होणार आहेत. त्यामुळेच निरुपयोगी प्लास्टीकचा वापर डांबरामध्ये करुन पालिका नजीकच्या रस्ता कामासाठी तो वापरावा, असे निर्देशही सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रशासनाला दिले आहेत.----मनपा: कोटीच्या कापडी पिशव्या वाटणारप्लास्टिकपासून बनविल्या जाणाºया पिशव्या तसेच प्लास्टिक आणि थर्माकॉलपासून बनविण्यात येणाºया विविध वस्तुंच्या वापर, उत्पादन, साठवणूक, विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांनी या आदेशाचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त लहुराज माळी यांनी केले आहे. नागरिकांनी कापडी पिशव्या वापरास प्राधान्य द्यावे. जिल्हा नियोजन समितीने कापडी पिशव्यासाठी १ कोटीचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या निधीतून महिनाभरात मनपाच्या वतीने कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात येईल, अशी माहितीही माळी यांनी दिली.

टॅग्स :NandedनांदेडPlastic banप्लॅस्टिक बंदीNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेडNanded zpनांदेड जिल्हा परिषद