शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
4
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
5
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
6
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
7
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
8
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
9
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
10
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
11
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
12
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
13
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
14
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
15
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
16
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
17
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
18
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
19
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
20
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!

शासकीय रुग्णालयात प्रसूतीपूर्व सोनोग्राफीस नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 16:55 IST

विष्णूपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्रकार

ठळक मुद्देमरणकाळ भोगत महिला जातात खाजगी केंद्रात आर्थिक दुर्बल रुग्णांना खाजगीत मोजावे लागतात हजारो रुपये

- शिवराज बिचेवार

नांदेड : विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सोनोग्राफी केंद्रामध्ये फक्त अत्यावश्यक महिला रुग्णांचीच सोनोग्राफी करण्यात येते़ प्रसूतीपूर्व सोनोग्राफीसाठी आलेल्या महिलांना थेट बाहेरचा रस्ता दाखविण्यात येतो़ त्यामुळे पोटात बाळ घेवून मोठी कसरत करीत या महिलांना तपासणीसाठी खाजगी केंद्र गाठावे लागते़ तपासणीचे अहवाल अन् डॉक्टरांच्या वेळा यामध्ये दोन ते तीन दिवसांचा कालावधी निघून जातो़ त्यामुळे गर्भवती महिलांना मरणकळा सोसण्याशिवाय पर्याय राहत नाही़ 

सुपर स्पेशालिटी प्रस्ताव पाठविणाऱ्या डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आजही अनेक विभाग पूर्ण क्षमतेने सुरु झाले नाहीत़ या ठिकाणी नांदेड, हिंगोली, परभणी, यवतमाळ, शेजारी आंध्र आणि कर्नाटक राज्यातून उपचारासाठी दररोज हजारो रुग्ण येतात़ रुग्णायालयाच्या बाह्य रुग्ण विभागात दररोज साधारणता १३०० ते १४०० तर आंतररुग्ण विभागात २५० रुग्ण दाखल होतात़ त्यामुळे रुग्णालयावरील ताण दिवसेंदिवस वाढतच आहे़ त्यातच प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्याही लक्षणीय असते़ सिझेरियनपेक्षा या ठिकाणी नॉर्मल प्रसूती करण्यावर या ठिकाणी अधिक भर देण्यात येतो़ हेही त्यामागचे प्रमुख कारण आहे़ परंतु प्रसूती विभागात असलेल्या खाटांच्या तुलनेत रुग्णांची संख्या अधिक असल्यामुळे बहुतांश वेळा एका खाटेवर दोन रुग्णांना उपचार घेण्याची वेळ येते़

त्यात बाळ सोबतच असल्याने अधिकच गैरसोय होते़ या ठिकाणी असलेल्या सोनोग्राफी केंद्रात साध्या सोनोग्राफी होत असल्या तरी, गर्भवती महिलांना मात्र सोनोग्राफीसाठी खाजगी केंद्रच गाठावे लागते़ त्यामागे सोनोग्राफीसाठी असलेली प्रचंड वेटींग हे ही प्रमुख कारण आहे़ त्याचबरोबर केंद्रातील कर्मचाऱ्यांकडून या महिलांना थेट खाजगी केंद्रात जाण्याचा सल्ला देण्यात येतो, अशाही तक्रारी आहेत. त्यामुळे अवघडलेल्या अवस्थेत या महिलांना सोनोग्राफीच्या तपासणीसाठी खाजगी केंद्र गाठावे लागते़ खाजगी केंद्रात साध्या सोनोग्राफीसाठी एक हजार रुपये तर कलर डॉपलरसाठी दोन हजार रुपये मोजावे लागतात़ रुग्णालयाबाहेरच असलेल्या केंद्राचे मात्र त्यामुळे फावत आहे़ त्यामुळे या ठिकाणी सर्वच गर्भवती महिलांची तपासणी होणे गरजेचे आहे़

५०८ खाटांवर ७५० रुग्णरुग्णालयात ५०८ खाटांची मंजूरी आहे़ परंतु प्रत्यक्षात रुग्णांची संख्या ही ७५० पेक्षा अधिक असते़ त्यामुळे एका खाटावर दोन रुग्णांना उपचार घेण्याची वेळ येते़ त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाईकांची संख्याही मोठी असते़ आजघडीला रुग्णालयात २४६ चतुर्थ श्रेणी कर्मचारी कार्यरत आहेत़ प्रत्यक्षात मागणी ही ५२० कर्मचाऱ्यांची आहे़ त्यामुळे अद्यापही या ठिकाणी २५० हून अधिक कर्मचाऱ्यांची गरज आहे़ त्याबाबत अनेकवेळा प्रस्ताव पाठवूनही त्याला मंजूरी मिळाली नाही़ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने आंतररुग्ण विभागाच्या कामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे़ येत्या काही दिवसात बाह्य रुग्ण विभाग आणि परिसराच्या स्वच्छतेसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत़ सध्याचा कंत्राटदार वर्षभर राहणार आहे़ सध्या तरी, त्यांचे काम समाधानकारक आहे़ दररोज रुग्णालयातील स्वच्छतेचा आढावा घेण्यात येत आहे़ अशी प्रतिक्रिया वैद्यकीय अधीक्षक डॉ़वाय़एच़चव्हाण यांनी दिली़ 

टॅग्स :Nandedनांदेडhospitalहॉस्पिटलpregnant womanगर्भवती महिला