शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यात आता रेशनकार्डसाठीही पोर्टेबिलीटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 00:05 IST

मोबाईलचा क्रमांक न बदलता ज्याप्रमाणे कंपनी बदलता येते. म्हणजेच, पोर्टेबिलीटी करता येते़ त्याचप्रमाणे यापुढे इतर कोणत्याही जिल्ह्यातील अथवा राज्यातील रेशनकार्ड जिल्ह्यातील कोणत्याही स्वस्त धान्य दुकानात चालू शकणार आहे़ नांदेड जिल्ह्यात हा पथदर्शी प्रकल्प लवकर राबविण्यात येणार असून पुरवठा विभागाच्या वतीने याची तयारी सुरु आहे़

ठळक मुद्देपथदर्शी प्रकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : मोबाईलचा क्रमांक न बदलता ज्याप्रमाणे कंपनी बदलता येते. म्हणजेच, पोर्टेबिलीटी करता येते़ त्याचप्रमाणे यापुढे इतर कोणत्याही जिल्ह्यातील अथवा राज्यातील रेशनकार्ड जिल्ह्यातील कोणत्याही स्वस्त धान्य दुकानात चालू शकणार आहे़ नांदेड जिल्ह्यात हा पथदर्शी प्रकल्प लवकर राबविण्यात येणार असून पुरवठा विभागाच्या वतीने याची तयारी सुरु आहे़एखाद्या राज्यातून अथवा शहरातून दुसरीकडे गेल्यानंतर आधीचे रेशनकार्ड रद्द करुन ते नव्या ठिकाणी काढावे लागते़ मात्र रेशनकार्ड न बदलता दुसऱ्या जिल्ह्यात अथवा राज्यात ते चालावे यासाठी केंद्र सरकारच्या वतीने सार्वजनिक वितरण प्रणाली एकीकृत वितरण व्यवस्थेवर (आयएम-पीडीएस) मागील काही दिवसांपासून काम सुरु होते़ केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी काही दिवसांपूर्वीच अशा प्रकारची योजना लवकरच सुरु करण्याची घोषणा करीत या योजनेसाठी १२७ कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचे जाहीर केले होते़ या पोर्टेबिलीटी शिवाय अतिरिक्त बनावट रेशनकार्ड रद्द करण्याचेही काम या प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे़ याबरोबरच ही प्रणाली रेशनकार्डचे व्यवस्थापन, वितरण, पुरवठा व रेशन दुकानाच्या स्वयमचलनाचेही काम करणार आहे़ याशिवाय पीडीएससाठी वेब आणि मोबाईल अ‍ॅप्लिकेशनदेखील तयार करण्यात येणार असून महाराष्ट्रासह दिल्ली, हरियाणा, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशमध्ये ही रेशनकार्डची पोर्टेबिलीटी लागू करण्यात येणार असल्याचे पासवान यांनी जाहीर केले होते़ दरम्यान, सुरुवात म्हणून चार राज्यांसह २२ जिल्ह्यांची या प्रायोगिक तत्त्वावरील योजनेसाठी निवड झाली आहे़ यात महाराष्ट्रातील नांदेड, मुंबई शहर, मुंबई ग्रामीण, यवतमाळ आणि चंद्रपूर तर आंध्र प्रदेशातील कृष्णा, गुंट्टुर, पश्चिम गोदावरी, कर्नुल आणि प्रकाशम्, तेलंगणा राज्यातील हैद्राबाद, नालगोंदा, खाम्म, नागारकारनुल, आदिलाबाद आणि निजामाबाद तर हरियाणा राज्यातील फरिदाबाद, गुरुग्राम, झांझर, रेवारी आणि सोनीपथ या जिल्ह्यांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे़ नांदेड जिल्ह्यात ही योजना राबविण्यासाठी पुरवठा विभागाकडून तयारी सुरु करण्यात आली असून पात्र रेशनकार्डधारकांनी आयएम-पीडीएस योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या स्वस्त धान्य दुकानदारशी संपर्क साधून तहसील कार्यालयात माहिती सादर करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी केले आहे़कोणाला मिळणार या योजनेचा लाभ...या योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशनकार्डधारकाकडे उपरोक्त राज्याच्या जिल्ह्यातील रेशनचे कार्ड हवे़ याबरोबरच आधारकार्डही आवश्यक आहे़ इतर राज्यांतील रेशनकार्डधारकास आयएम-पीडीएस योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील धान्य वाटपाच्या ठरलेल्या प्रमाण व दरानुसार धान्य वितरीत करण्यात येणार आहे़

टॅग्स :NandedनांदेडNanded zpनांदेड जिल्हा परिषद