शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महिला तलाठ्यास शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 00:45 IST

दहा वर्षापूर्वी झालेल्या फेरफाराची नोंद सातबारावर घेण्याच्या विषयावरुन कंधारचे प्रभारी तहसीलदार सारंग चव्हाण यांनी उमरज तलाठी सज्जाच्या तलाठी सुहास मुळजकर यांना शिवीगाळ केल्याची तक्रार राज्य तलाठी संघाच्यावतीने जिल्हाधिका-यांकडे केली. तहसीलदारांवर कारवाईच्या मागणीसाठी मंगळवारी तलाठ्यांनी काम बंद आंदोलनही केले.

ठळक मुद्देकाम बंद आंदोलन : कंधारच्या प्रभारी तहसीलदारावर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : दहा वर्षापूर्वी झालेल्या फेरफाराची नोंद सातबारावर घेण्याच्या विषयावरुन कंधारचे प्रभारी तहसीलदार सारंग चव्हाण यांनी उमरज तलाठी सज्जाच्या तलाठी सुहास मुळजकर यांना शिवीगाळ केल्याची तक्रार राज्य तलाठी संघाच्यावतीने जिल्हाधिका-यांकडे केली. तहसीलदारांवर कारवाईच्या मागणीसाठी मंगळवारी तलाठ्यांनी काम बंद आंदोलनही केले.कंधार तालुक्यातील उमरज तलाठी सज्जाच्या तलाठी सुहास मुळजकर यांना १३ मार्च रोजी प्रभारी तहसीलदार चव्हाण यांनी एका फेरफार प्रकरणाची नोंद सातबाराला का घेतली नाही? याची विचारणा केली. त्यावेळी मुळजकर यांनी सदर प्रकरणात कलम १५५ नुसार आदेश मिळण्याकरिता प्रकरण दाखल केल्याचे सांगितले. त्यावेळी संतप्त झालेल्या तहसीलदार चव्हाण यांनी महिला तलाठी मुळजकर यांना फोनवरुन शिवीगाळ केली. या घटनेचा राज्य तलाठी संघटनेच्या जिल्हा शाखेने निषेध केला. या प्रकरणी तहसीलदारावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची संघटनेच्यावतीने भेट घेवून सदर प्रकार सांगितला.यावेळी तलाठी संघाचे राज्य उपाध्यक्ष एम.एम. काकडे, एन.जी. कानगुले, उदयकुमार मिसाळे, प्रफुल्ल खंडागळे, मनोज देवणे, एच.जी. पठाण, कंधार तालुकाध्यक्ष मारोती कदम, अनिद्ध जोंधळे, आय.बी. मडगीलवार आदींची उपस्थिती होती.याच फेरफार प्रकरणात प्रारंभी चव्हाण यांनी सातबारावर नोंद घेऊ नये, असे सांगितले होते. त्यानंतर मात्र नोंद घेण्यासाठी तलाठी मुळजकर यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणात आता कारवाईकडे लक्ष लागले आहे.उपविभागीय अधिकाºयांमार्फत चौकशीचे आदेशतलाठी संघटनेचे शिष्टमंडळ आले असता सदर प्रकाराची माहिती जिल्हाधिकाºयांनी घेतली. सदर प्रकरणी कंधार उपविभागीय अधिकाºयांमार्फत चौकशीचे आदेशही जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. चौकशीनंतर कारवाई केली जाईल, असेही सांगण्यात आले. दरम्यान संघटनेच्यावतीने बुधवारी संपूर्ण जिल्हाभरात काळ्या फिती लावून काम केले जाणार आहे.संभाषणाची आॅडीओ क्लिप झाली व्हायरलप्रभारी तहसिलदार सारंग चव्हाण आणि तलाठी सुहास मुळजकर या दोघांमध्ये मोबाईलवरुन झालेल्या संभाषणाची क्लिप व्हायरल झाली आहे़ या संभाषणा दरम्यान, तहसिलदार चव्हाण हे वारंवार तलाठी मुळजकर यांना अपमानास्पद वाटेल अशा शब्दाचा उच्चार करीत होते़ तर मुळजकर या मात्र त्यांना अदबीने बोलत होत्या़ संभाषणाची क्लिप व्हायरल झाल्यानंतर ती तलाठी संघाच्या वॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पोहचली़ त्यामुळे घडलेल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त होत आहे़