शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅव्हल्स चालकाकडून परतीच्या प्रवासात लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 23:54 IST

मुंबईसाठी तब्बल ३ हजार तर पुण्यासाठी २ हजारांचे भाडे प्रति व्यक्ती आकारले जात आहे.

ठळक मुद्देदिवाळीनंतर परतणाऱ्यांना अव्वाच्या सव्वा भाडे

नांदेड : दिवाळी साजरी केल्यानंतर परतीच्या प्रवासाला लागलेल्या प्रवाशांची ट्रॅव्हल्सकडून मोठी लूट चालू आहे. नांदेडहून निघणाºया पुणे, मुंबई, नागपूर आदी लांब अंतराच्या गाड्यामध्ये प्रवासाचे दर दुपटीने वाढविण्यात आले आहे. मुंबईसाठी तब्बल ३ हजार तर पुण्यासाठी २ हजारांचे भाडे प्रति व्यक्ती आकारले जात आहे.प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जादा भाडे घेतल्यास तक्रार करावी, असे निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. मात्र त्यानंतरही ही लूट खुलेआम सुरू आहे. पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर आदी शहराकडे जाणाºया बस, रेल्वे सध्या फुल झाल्या आहेत. त्यामुळे प्रवासी मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल्सकडे वळले आहेत. याचाच फायदा ट्रॅव्हल्सकडून घेतला जात आहे. पुण्यासाठी आजघडीला २ हजार रुपये तर मुंबईला ३ हजार रुपये जीएसटीसह भाडे आकारले जात आहे. राज्यातील काही भागात जादा भाडे आकारल्या प्रकरणी ट्रॅव्हल्सवर कारवाई करण्यात आली आहे. नांदेडमध्ये मात्र अशी कोणतीही कारवाई अद्यापपर्यंत झाली नाही. त्यामुळे प्रवाशांची ही लूट खुलेआम अशीच सुरू राहणार काय? असा प्रश्न प्रवाशांमधून विचारला जात आहे.आजघडीला पुणे, नांदेड, पुणे या मार्गावर प्रतिदिन १५० ते २०० ट्रॅव्हल्स धावतात. मुंबईला जाणाºया ट्रॅव्हल्सचीही संख्या याहून अधिक आहे. प्रवाशांची मागणी असतानाही मुंबई आणि पुण्यासाठी रेल्वे सोडल्या जात नाही. यात रेल्वे अधिकारी व ट्रॅव्हल्स चालकांचे साटेलोटे असल्याचा आरोप खुद्द माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनीही केला होता. त्यानंतरही रेल्वे विभागाने आपल्या वेळापत्रकात कोणताही बदल केला नाही. शहरात वर्दळीच्या काळात मोठ्या संख्येने ट्रॅव्हल्स शहरात येतात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. पोलिस अधीक्षकांनी त्याकडे लक्ष वेधले असले तरी जादा दराची आकारणी रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग काय कारवाई करेल याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :NandedनांदेडBus Driverबसचालक