शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ वादावरून चाकूने भोसकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:13 IST

महिलेचे मंगळसूत्र हिसकावले नांदेड : फिरायला जात असलेल्या हदगाव तालुक्यातील तळेगाव येथील सुवर्णमालाबाई मनोज जाधव या महिलेचे मंगळसूत्र चोरट्यांनी ...

महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

नांदेड : फिरायला जात असलेल्या हदगाव तालुक्यातील तळेगाव येथील सुवर्णमालाबाई मनोज जाधव या महिलेचे मंगळसूत्र चोरट्यांनी सोमवारी हिसकावले. सुवर्णमालाबाई या पती व लहान मुलासह तामसा ते नांदेड रस्त्यावर फिरायला गेले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने १९ हजाराचे मंगळसूत्र लंपास केले.

इतवारा भागात दुकान फोडले

नांदेड : जुन्या नांदेडातील इतवारा भागात जि.प. हायस्कूलजवळ असलेले श्रुती कॉमन सर्व्हिस ऑनलाइन दुकान फोडून दुकानातील कॅमेरा, एलसीडी, मॉनिटर व रोख रक्कम असा ६ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी मुंजाजी लहाने यांच्या तक्रारीवरून इतवारा ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सर्पदंशाने मृत्यू

नांदेड : नवीन कौठा येथील सुमित्रा बळीराम पांचाळ यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्या. पांचाळ या घरात झोपल्या असता त्यांच्या पायाला सापाने चावा घेतला. उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल केला.

मटका चालकाविरुद्ध गुन्हा

नांदेड : जुन्या नांदेडातील कुंभारगल्ली भागात कल्याण ओपन मिलन नावाचा मटका सुरू होता. या मटका अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून १ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मनोज परदेशी यांच्या तक्रारीवरून वजिराबाद ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.