शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

फास लटकविलेल्याचे वाचले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 00:29 IST

राज्यात दररोज आत्महत्येच्या घटना घडत आहेत़ त्या रोखण्यात अद्याप तरी शासनाला यश आले नाही़ परंतु नांदेडात माली पाटील चौकात झाडाला गळफास घेतलेल्या एका कामगाराचे काही तरुणांनी प्राण वाचविले़

ठळक मुद्देगळफासाचा प्रयत्न एकाने पाय उचलून धरले तर दुसऱ्याने फास मोकळा केला

नांदेड : राज्यात दररोज आत्महत्येच्या घटना घडत आहेत़ त्या रोखण्यात अद्याप तरी शासनाला यश आले नाही़ परंतु नांदेडात माली पाटील चौकात झाडाला गळफास घेतलेल्या एका कामगाराचे काही तरुणांनी प्राण वाचविले़ एकाने पाय उचलून धरले तर दुस-याने गळ्यातील फास सोडविला़ काही सेकंदाच्या या थरारात आत्महत्या करणा-या कामगाराचे मात्र प्राण वाचले़ ही घटना गुरुवारी दुपारी घडली़गुरुवारी दुपारी माली पाटील चौक परिसरात विलास कोकाटे, कृष्णा शिंदे व मोहन कदम हे मित्र उभे होते़ त्याचवेळी त्यांना जवळच असलेल्या एका झाडाला एक व्यक्ती दोर टाकून गळफास घेतल्याचे आढळून आले़ त्यांनी आरडाओरड करीतच झाडाकडे धाव घेतली़ परंतु तोपर्यंत त्या व्यक्तीने गळ्यात दोर टाकून पाय मोकळे सोडले होते़ त्याचवेळी धावत आलेल्या विलास कोकाटे, कृष्णा शिंदे आणि मोहन कदम यातील एकाने त्यांचे पाय उचलून धरले़ तर दुस-याने त्यांच्या गळ्यातील फास काढला़ यावेळी आत्महत्येचा प्रयत्न करणारे राजू किसन गायकवाड (रा़दिग्रस ता़अर्धापूर) हे जोर जोरात फक्त दोन मिनिटे थांबा म्हणत होते़ परंतु या तरुणांनी अत्यंत चपळाईने त्यांच्या गळ्यातील दोर काढत त्यांना खाली ओढले़ काही सेकंदाच्या या थरारात गायकवाड यांचे प्राण वाचले़ परंतु खाली उतरवताच गायकवाड यांनी दोरीसकट पळ काढण्याचा प्रयत्न केला़ यावेळी तरुणांनी त्यांना धरुन ठेवले़ घटनास्थही श्याम कोकाटे व सत्यवान अंभोरे हेही दाखल झाले़ लगेच विमानतळ पोलिस ठाण्याला ही माहिती देण्यात आली़ पोनि़नानवारे यांनी गायकवाड यांना ताब्यात घेतले़ यावेळी पोलिसांनी गायकवाड यांचे प्राण वाचविणा-या तरुणांचे कौतुक केले़ यावेळी श्याम कोकाटे, सत्यवान अंभोरे, गजानन कोकाटे, गणेश कोकाटे, सचिन कोकाटे, पवन कोकाटे, साईप्रसाद जाधव, राजेश पवार, दत्ता पवार, भाऊ पवार, राजू कोकाटे यांची उपस्थिती होती़निराशेतून प्रकारगायकवाड हे नांदेडातच खताच्या दुकानावर कामगार होते़ परंतु त्यातून आर्थिक प्रश्न सुटत नसल्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून निराश होते़गुरुवारी गळफास घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला़ परंतु या ठिकाणी असलेल्या तरुणांनी प्रसंगावधान राखत वेळीच धाव घेवून त्यांचे प्राण वाचविले़

टॅग्स :NandedनांदेडSocialसामाजिक