शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडमध्ये प्रलंबित कामांचे आदेश होणार रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 12:13 IST

कार्यारंभ आदेश दिल्यानंतरही वर्षानुवर्षे काम सुरू न करणाऱ्या ठेकेदारांना अखेर आयुक्तांनी अंतिम इशारा देताना मार्चअखेर काम सुरू न झाल्यास ही कामे रद्द करुन नव्याने कामे केली जातील, असे स्पष्ट केले आहे. कार्यारंभ आदेश मिळूनही सुरू न झालेली शहरात जवळपास ६ ते ७ कोटी रुपयांची कामे रखडली आहेत.

ठळक मुद्देकंत्राटदारांना तंबी : मार्चअखेरपर्यंत कामे सुरु करा

नांदेड : कार्यारंभ आदेश दिल्यानंतरही वर्षानुवर्षे काम सुरू न करणाऱ्या ठेकेदारांना अखेर आयुक्तांनी अंतिम इशारा देताना मार्चअखेर काम सुरू न झाल्यास ही कामे रद्द करुन नव्याने कामे केली जातील, असे स्पष्ट केले आहे. कार्यारंभ आदेश मिळूनही सुरू न झालेली शहरात जवळपास ६ ते ७ कोटी रुपयांची कामे रखडली आहेत.

महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी मंगळवारी विभाग प्रमुखांची बैठक घेताना प्रलंबित तसेच चालू कामांचा आढावा घेतला. प्रलंबित असलेली कामे वर्षानुवर्षे तशीच आहेत. विशेष म्हणजे, महापालिका प्रशासनाने या कामांना कार्यारंभ आदेश दिले असतानाही कामे का केली गेली नाहीत? हा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. बांधकाम विभागाची ४ कोटींची तर पाणीपुरवठा विभागाची जवळपास ३ कोटींची कामे अशा पद्धतीने प्रलंबित आहेत.विशेष म्हणजे, महापालिकेने सदर काम घेणा-या ठेकेदारांना वारंवार नोटीस बजावली. मात्र या नोटिसीला ठेकेदारांनी केराची टोपलीच दाखविली होती. ही बाब पुढे येताच आयुक्तांनी कठोर भूमिका घेताना मार्चअखेर प्रलंबित कामे सुरू न केल्यास कामे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कामे सुरू झाल्याचे आवश्यक ते छायाचित्र, पुरावा सादर केल्यानंतरच ही कामे सुरू ठेवली जातील, असेही स्पष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे रखडलेली ६ ते ७ कोटींची कामे चार दिवसांत ठेकेदार सुरू करतात काय? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

कामे सुरू करण्याच्या आदेशासोबतच ज्या वर्षात कामे केली त्याच वर्षात देयकाची मागणी करणेही बंधनकारक करण्याचा निर्णय आयुक्त देशमुख यांनी घेतला आहे. महापालिकेत सध्या कोणत्याही वर्षाचे देयके सादर केले जात आहेत. ही देयके देण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून तगादाही लावला जात आहे. परिणामी चालू कामांची देण्यास विलंब होत आहे.

नव्या आर्थिक वर्षात पावती संदर्भातही महत्त्वाचा निर्णय मंगळवारी झालेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत घेतला आहे. त्या -त्या वर्षीचेच देयक पावती ही त्याचवर्षी वैध मानली जाणार आहे. २०१८- १९ या वर्षासाठीच सदर पावतीबुक कार्यान्वित राहील. जुन्या पावती बुकाने कोणताही व्यवहार केला जाणार नाही़ मनपाच्या उत्पन्नवाढीसाठी नव्या आर्थिक वर्षात आणखी कठोर निर्णय घेण्यात येतील, असेही आयुक्त देशमुख यांनी स्पष्ट केले़

रेल्वे विभागाकडून ३८ वर्षांचा कर वसूलदक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडे महापालिकेचा थकित असलेला ३८ वर्षांपासूनचा कर वसूल करण्यात महापालिकेला यश आले आहे. रेल्वे विभागाने मंगळवारी १ कोटी रुपयांचा धनादेश महापालिकेला सुपूर्द केला आहे. बुधवारीही १ कोटी रुपये रेल्वे विभाग मनपाला देणार आहे. रेल्वे विभागाकडे महापालिकेचा जवळपास ८ कोटी रुपयांचा कर थकित आहे. त्यात व्याजाचीही रक्कम मोठी आहे. बुधवारी होणाºया चर्चेत व्याजासंदर्भात निर्णय होईल, असे आयुक्त देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :commissionerआयुक्तpwdसार्वजनिक बांधकाम विभागTaxकरMuncipal Corporationनगर पालिकाNandedनांदेड