शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
3
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
4
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
6
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
7
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
8
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
9
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
10
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
11
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
12
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
13
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
17
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
18
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
19
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
20
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही फी देण्यास पालकांचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:18 IST

नांदेड : कोरोनाच्या संकटात शाळा बंद असल्या तरीही पूर्ण फी शाळेला भरण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे; परंतु कोरोनामुळे ...

नांदेड : कोरोनाच्या संकटात शाळा बंद असल्या तरीही पूर्ण फी शाळेला भरण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे; परंतु कोरोनामुळे संकटात असलेल्या बहुतांशी पालकांनी फी भरण्यासाठी नकार दिला आहे. अशा परिस्थितीत नांदेड जिल्ह्यातील मेंढला, ता. अर्धापूर येथील निर्मल विद्यालय प्राथमिक ते उच्च माध्यमिक आणि निर्मल स्कूल इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांना २०२०- २१ या वर्षात फीमध्ये ९० टक्के सवलत देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

कोरोनामुळे देशात आर्थिक आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हाताला काम नसल्यामुळे जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा बिकट परिस्थितीत विद्यार्थ्यांचे हित व पालकांची परिस्थिती लक्षात घेऊन निर्मल विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष राजेश्‍वर पालीमकर यांनी सर्वच विद्यार्थ्यांची पहिली ते दहावीपर्यंत संपूर्ण वर्षाची ९० टक्के फी माफ आणि गरीब विद्यार्थ्यांची पूर्ण फी माफ करून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. पूर्ण राज्यात आज शाळेकडून पूर्ण फी वसूल करण्यासाठी सक्ती केली जात असतानाच निर्मल विद्यालयाने विद्यार्थ्यांची ९० टक्के फी माफ करून पूर्ण राज्यातील शिक्षण क्षेत्रात एक सामाजिक आदर्श घालून दिला आहे.

शाळा म्हणजे फक्त पैसा कमविण्याचे साधन नसून संस्कारक्षम पिढी घडविण्याची मंदिरे आहेत. या मंदिराबद्दल चुकीचा संदेश जाऊन गोरगरीब पालकांच्या मनात शाळेबद्दल तिरस्कार निर्माण होऊ नये, तर आदरच राहावा, या उदात्त भावनेतून काम करणाऱ्या निर्मल विद्यालयाचा हा आदर्श राज्यातीलच नव्हे, तर देशातील शिक्षण संस्थाचालकांनी घेतल्यास शिक्षण क्षेत्राबद्दल जनतेच्या मनातील विचारही निश्चितच बदलेल. त्यांच्या या निर्णयाचे कौतुक होत असून, विचारवंत प्रा. डॉ अनंत राऊत, मनोहर बंडेवार, भीमराव हत्तीआंबिरे, रामराव सूर्यवंशी, शिक्षणतज्ज्ञांनी व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांचे स्वागत केले.