शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड येथे आॅम्पिकपूर्व चाचणीत धावले 3 हजार धावपटू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 14:09 IST

जपानमधील टोकियोत  २०२० मध्ये होणार्‍या आॅलिम्पिक स्पर्धेत भारतातील धावपटूंनी चमकदार कामगिरी करावी या उद्देशाने एनवायसीएस व केंद्र सरकारच्या पुढाकाराने मराठवाड्यातील धावपटूंची २४ जानेवारी येथील यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर चाचणी स्पर्धा पार पडली़ यात मराठवाड्यासह अमरावती, पुणे व अन्य ठिकाणाहून सुमारे तीन हजार धावपटूंनी सहभाग घेतला़ 

ठळक मुद्देएनवायसीएस व केंद्र शासनाचा पुढाकार धावपटूंच्या चमकदार कामगिरीसाठी घेतली निवड चाचणी

नांदेड : जपानमधील टोकियोत  २०२० मध्ये होणार्‍या आॅलिम्पिक स्पर्धेत भारतातील धावपटूंनी चमकदार कामगिरी करावी या उद्देशाने एनवायसीएस व केंद्र सरकारच्या पुढाकाराने मराठवाड्यातील धावपटूंची २४ जानेवारी येथील यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर चाचणी स्पर्धा पार पडली़ यात मराठवाड्यासह अमरावती, पुणे व अन्य ठिकाणाहून सुमारे तीन हजार धावपटूंनी सहभाग घेतला़ 

बुधवारी सकाळी ९ वाजता यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर सावरपाडा एक्स्पेस म्हणून ओळखल्या जाणार्‍या आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, मधुबाला साबू, जिल्हा क्रीडाधिकारी गंगालाल यादव, प्राचार्य जाधव, राजेश आढाव, अनिल वाघ, मंगेश  बेडखळे, शिक्षणाधिकारी बळवंत जोशी, राजे खंडेराय देशमुख, अनिरुद्ध शिरसाठ, विक्रांत खेडकर, भगवान नागरगोजे, प्रलोभ कुलकर्णी यांची उपस्थिती होती़ १००  मीटर, २०० मीटर व ४०० मीटर धावण्याच्या  चाचणीत ११ ते १४ व १५ ते १७ वयोगटातील धावपटूंनी सहभाग घेतला़  निवड चाचणीत औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या आठ जिल्ह्यांसह पुणे, अमरावतीहूनदेखील धावपटूंनी सहभाग घेतला़. जवळपास साडे तीन हजारांहून अधिक धावपटू यात सहभागी झाले होते़

या निवड चाचणीच्या यशस्वीतेसाठी  कविता शिरसाठ, दीपाली खेडकर, रमेश बोबडे, पीयूष वाटेगावकर, विष्णू पूर्णे, राम भालके, बालाजी नागपुरे आदींनी प्रयत्न केले. संचालन पूजा शिराढोणकर,  प्रास्ताविक राजेश आढाव व आभारप्रदर्शन विक्रांत खेडकर यांनी केले़ या निवड चाचणीस सनतकुमार महाजन, डॉ.दि.भा.जोशी, डॉ. अर्जुन मापारे, बाळासाहेब देशमुख शेंबोलीकर, प्राचार्य संजय पाटील शेळगावकर, सुहास पाटील टाकळीकर, योगेश अंबुलगेकर, धनराज शिरोळे, सुदर्शन यादव, शिवकुमार पत्रे, कृष्णा उदावंत, गंगाधर कोलमवार, गोगे शिवा यांनी भेट दिली़ 

सहभागींनी आॅलिम्पिकपर्यंत धडक मारावीमी आश्रमशाळेतून आज मोठी मजल मारली आहे़  जागतिक पातळीवर धावपटू म्हणून नावलौकिक मिळविताना अनेक प्रकारच्या कष्टाला सामोरे जावे लागले, असा अनुभव कविता राऊत यांनी सांगितला़ तसेच या निवड चाचणीत सहभागी खेळाडूंनीही या स्पर्धेत सहभागी होऊन आॅलिम्पिकपर्यंत धडक मारावी अशी अपेक्षा व्यक्त केली़