शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

एकाच सरणावर आई आणि दोन चिमुकल्या मुलींना दिला भडाग्नी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:43 IST

कुंडलवाडी शहरातील नई आबादीमध्ये वास्तव्यास असलेल्या यादव श्रीनिवास कांबळे याच्या मयत पत्नी व दोन चिमुकल्या मुलींना येथील तलकापूर रोडवरील स्मशानभूमीत एकाच सरणावर मयत पूजा कांबळेच्या वडिलांनी पोटच्या लेकीला आणि नातीला भडाग्नी दिला.

ठळक मुद्देकुंडलवाडी : २३ जून रोजी मारली होती गोदावरी नदीत उडी

लोकमत न्यूज नेटवर्ककुंडलवाडी : कुंडलवाडी शहरातील नई आबादीमध्ये वास्तव्यास असलेल्या यादव श्रीनिवास कांबळे याच्या मयत पत्नी व दोन चिमुकल्या मुलींना येथील तलकापूर रोडवरील स्मशानभूमीत एकाच सरणावर मयत पूजा कांबळेच्या वडिलांनी पोटच्या लेकीला आणि नातीला भडाग्नी दिला.२३ जून रोजी पूजा यादव कांबळे हिने तिच्या दोन मुलींसह गोदावरी पात्रात आत्महत्या केली होती. पैकी एक सुविद्या कांबळे हिला शोधण्यास पोलिसांना यश आले होते. परंतु दिवस मावळल्याने शोधकार्य थांबले. दुसऱ्या दिवशी २४ जून रोजी सकाळी ७ ते ८ वाजेच्या दरम्यान मयत पूजा यादव कांबळे व तिची ५ वर्षीय मुलगी शिवानी कांबळे यांचे प्रेत पाण्यावर तरंगताना दिसले. त्यांचे प्रेत पोलिसांनी मच्छीमारांच्या सहाय्याने काढून कुंडलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले.रात्री (काल) उशिरा ३ वर्षीय सुविद्या कांबळेवर उत्तरीय तपासणी केली व आज आई व मुलीवर उत्तरीय तपासणी करुन मृतदेह पोलिसांच्या ताब्यात दिले. तीनही मृतदेह मयताचे वडील चांदू गणपती वाघमारे (रा. तेल्लूर ता. कंधार) यांच्याकडे दिले. दुपारी ३ ते ४ च्या दरम्यान मयत आई व दोन मुलींवर अंत्यसंस्कार करताना सर्वांचेच डोळे पाणावले होते. तीनही मृतदेहाचे डॉ. विनोद माहुरे यांनी शवविच्छेदन केले.याप्रकरणी चांदू गणपती वाघमारे रा. तेल्लूर यांच्या फिर्यादीवरुन कुंडलवाडी पोलिसांत यादव श्रीनिवास कांबळे याच्यावर हुंडाबळीचा ४९८, ३०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला़ यादव कांबळे यास मुखेड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गजानन कागणे हे करीत आहेत.

 

टॅग्स :NandedनांदेडSuicideआत्महत्या