लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : औषधी आणण्यासाठी गेलेल्या एका १६ वर्षीय युवतीला पळवून नेल्याची घटना जुन्या नांदेडातील मिल्लतनगर येथे ३ जानेवारी रोजी घडली.मिल्लतनगर येथील सदर युवती आपल्या बहिणीसाठी औषधी आणण्यासाठी घराबाहेर पडली होती. त्यावेळी तिला अज्ञात लोकांनी पळवून नेले. या प्रकरणी युवतीच्या पित्याने तक्रार तक्रार दिली. या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल केला.
जुन्या नांदेडात अल्पवयीन मुलीस पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:56 IST