शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

देवगिरी एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर चालतात उमरीतील कार्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 19:16 IST

नांदेडहूनच अधिकारी, कर्मचारी करतात नित्य नियमाने अपडाऊन

ठळक मुद्देकाही कर्मचारी अकरा वाजेनंतर कार्यालयात

- बी.व्ही.चव्हाण

उमरी : येथील तहसील, पंचायत समिती,  कृषी,  भूमीअभिलेख,  रजिस्ट्री कार्यालय आदी राज्य सरकारच्या अनेक कार्यालयांतील लेटलतीफ अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे.  

उमरी  येथील विविध शासकीय कार्यालयांत  कार्यरत असणारे बहुतांशी अधिकारी व कर्मचारी हे नांदेडहून अपडाऊन करतात. काहीजण स्वत:च्या वाहनाने तर काही कर्मचारी देवगिरी एक्स्प्रेस या रेल्वेगाडीने अपडाऊन करतात.  त्यामुळे बहुतांश कार्यालये देवगिरीच्या वेळापत्रकावर चालतात, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.  सोमवारी अनेक अधिकारी व कर्मचारी आपापल्या सोयीप्रमाणे उशिराने कार्यालयात हजर झाले.  कार्यालयातील एक दोन खुर्च्या सोडल्या तर सर्वच खुर्च्या रिकाम्या होत्या.

विशेष म्हणजे, येथील तहसील कार्यालयात लेटलतीफ अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या अधिक प्रमाणात दिसून आली. तहसीलदार, सर्व  नायब तहसीलदार, पेशकार, शिपाई, अव्वल कारकून आदी कर्मचारी साडेदहा वाजताच्या नंतरच कार्यालयात हजर झाले. तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचे अव्वल कारकून यु.एस. गोणे हे १०़३२ वाजता  हजर झाले़ पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ए.बी. गोरे हे १०़४१ ला कार्यालयात आले. तहसील कार्यालयाचे लिपिक व्ही.जी.इंदूरकर हे १०़४४ वाजता कार्यालयात उपस्थित झाले.  तहसील कार्यालयाचे शिपाई जकीयोदिन व कोतवाल प्रियंका अनंतवार १०़४२ वाजता, तहसील कार्यालयातील आवक-जावक विभागाच्या जी.एम  मोतीपवळे या १०़५३ वाजता, पेशकार आर. बी. मुत्तेपवार  १०़४९ वाजता,

पंचायत समिती सांख्यिकी विस्तार अधिकारी बी. डी. काकडे १०़४९ वाजता, मग्रारोहयो  विभागाच्या साहाय्यक कार्यक्रम अधिकारी आठवले, गोंडगे १०़५३ वाजता, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोलकुमार आंदेलवाड, साहाय्यक गटविकास अधिकारी नारवटकर,  कार्यालयीन अधीक्षक ताटीकांबळे, विस्तार अधिकारी (पंचायत) मुकनर हे चारही जण  ९़५७  मिनिटांनी कार्यालयात हजर झाले. एकंदरीत कार्यालयात उशिराने येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून त्यांना प्रशासकीय नियम, शिस्त याचे काहीही देणेघेणे नाही किंवा त्यांचे कोणीच काही करू शकत नाही. अशाच आविभार्वात होते़

अकरा वाजेनंतर कार्यालयातरोजगार हमी योजना संगणक आॅपरेटर शिंदे १०़०५ वाजता, पंचायत समितीचे वरिष्ठ साहाय्यक आरोळे, कनिष्ठ अभियंता स्वामी,  कृषी अधिकारी एस. एन. पठाण, साहाय्यक लेखाधिकारी पी.पी. भुसारी, कनिष्ठ लेखाधिकारी एस. के. माटाळकर हे १०़०७ वा. कार्यालयात आले. तहसील कार्यालयाचे शिपाई अहमद अलीखान १०़१४ वा. तर  कोतवाल शेख हे १०़५८ मिनिटांनी कार्यालयात आले. उशिरा आलेले प्रत्येक जण तोंड लपवून कार्यालयात घुसण्याच्या प्रयत्नात होते़ तर ११ वाजेनंतर आलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तर  कहरच केला. त्यांनी मात्र कार्यालयात बिनधास्तपणे एन्ट्री केली. 

टॅग्स :NandedनांदेडTahasildarतहसीलदारrailwayरेल्वे