शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

चैत्र नवरात्र महोत्सवानिमित्त पहिली माळ अर्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 01:03 IST

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक व मूळ पीठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माहूरगडावरील श्री रेणुकामाता मंदिरात प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) ते चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच ६ एप्रिल रोजी पहिली माळ अर्पण करण्यात आली.

श्रीक्षेत्र माहूर : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक व मूळ पीठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माहूरगडावरील श्री रेणुकामाता मंदिरात प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) ते चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच ६ एप्रिल रोजी पहिली माळ अर्पण करण्यात आली.६ एप्रिल रोजी ध्वजारोहण केल्यानंतर गुढी उभारून गुढीचे पूजन करून पिवळे वस्त्र अर्पण करत मातेची अलंकार महापूजा करुन घटस्थापना करण्यात आली. यावेळी लातूरचे मुख्य न्यायाधीश जोशी यांच्या हस्ते तसेच पुष्पपूजनाने या महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. यानंतर भाविकांना पूरणपोळी तुपाचा महाप्रसाद देण्यात आला. महापूजा विश्वस्त तथा पुजारी चंद्रकांत भोपी, विनायकराव फांदाडे यांनी पार पाडली.या महोत्सवादरम्यान संस्थानने ६ ते १४ एप्रिल या कालावधीत भविकांसाठी दररोज महाप्रसादाची व्यवस्था केली आहे. १० एप्रिल रोजी रात्री ७ ते १० वाजता प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांचा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आयोजित केला आहे.६ एप्रिल रोजी सकाळी ६ ते १० या वेळेत पहिली माळ अर्पण करताना स्वरभास्कर नितीनजी पंडित धुमाळ यांच्या सनईवादन कार्यक्रमाने सुरुवात करण्यात आली तर रात्री ७ ते १० वाजेपर्यंत गायक पंडित संजय जोशी यांचा गायनाचा कार्यक्रम हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी विश्वस्त चंद्रकांत भोपी व संजय काण्णव यांच्यासह सर्व विश्वस्त उपस्थित होते़ मंदिरात पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती़१० एप्रिल रोजी पंचमीनिमित्त मातेला अलंकार महापूजा, फलपूजन व द्राक्षाची आरास घालण्यात येणार असून १२ एप्रिल रोजी कुमारिका पूजन, अलंकार महापूजा,महाआरती, छबिना,१३ एप्रिल रोजी अलंकार महापूजा व चंडीयागास प्रारंभ, पूर्णाहुती १४ एप्रिल रोजी अलंकार महापूजेने या नवरात्र महोत्सवाची सांगता होणार आहे.

टॅग्स :NandedनांदेडReligious Placesधार्मिक स्थळेReligious programmeधार्मिक कार्यक्रम