शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड शहराला आजपासून तीन दिवसांआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 00:17 IST

विष्णूपुरी प्रकल्पात दिवसेंदिवस होणारी पाण्याची घट पाहता नांदेड शहराला २५ एप्रिलपासून तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

ठळक मुद्देविष्णूपुरी : दरदिवशी सुरु आहे ०.३२ दलघमी पाण्याचा उपसा

नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पात दिवसेंदिवस होणारी पाण्याची घट पाहता नांदेड शहराला २५ एप्रिलपासून तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ऐन उन्हाळ्यात शहरवासियांना पाण्यासाठी आता दोनऐवजी तीन दिवसांची वाट पहावी लागणार आहे.विष्णूपुरी प्रकल्पातून आजघडीला बाष्पीभवन, शेतीसाठी उपसा, औद्योगिक वापर यामुळे विष्णूपुरी प्रकल्पातून दररोज ०.३२ दलघमी पाणी उपसले जात आहे. या सर्व पाणी उपशामुळे विष्णूपुरीतील उपलब्ध जलसाठा पाहता शहराला मे अखेरपर्यंत पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे २५ एप्रिलपासून नांदेड शहरात २ दिवसांऐवजी तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय प्रभारी आयुक्त अशोक काकडे यांनी घेतला आहे.महापालिकेने शहरासाठी विष्णूपुरी प्रकल्पात ३२ दलघमी पाणी राखीव केले होते. शहराला दरवर्षी ३२.४० दलघमी पाणी आवश्यक आहे. आजघडीला विष्णूपुरी प्रकल्पात ९.४५ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. शहराला दरमहा २.७० दलघमी पाणी आवश्यक आहे. मात्र प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात सुरू असलेला उपसा यामुळे पाणी झपाट्याने कमी होत आहे. यावर आता उपाययोजना आवश्यक आहेत.विष्णूपुरीसह नांदेड शहराला पर्यायी पाणीपुरवठा योजनेद्वारेही पाणी दिले जाते. इसापूर प्रकल्पातून आतापर्यंत तीन पाणीपाळ्या घेतल्या आहेत. पहिली पाळी २० डिसेंबर २०१८ रोजी, दुसरी १ मार्च २०१९, तिसरी ३ मार्च आणि आता चौथी पाणीपाळी २५ एप्रिल रोजी घेण्यात आली आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी बोलाविली आज बैठकविष्णूपुरीतील झपाट्याने कमी होत असलेला पाणी उपसा पाहता नांदेड शहराचा पाणीप्रश्न ऐरणीवर आला आहे. मे अखेरपर्यंत कसेबसे पाणी उपलब्ध होईल. पण पावसाळा लांबला तर काय? हा प्रश्नही पुढे आला आहे. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी पाणीप्रश्नावर चर्चा करण्यासाठी महापालिकेसह पाटबंधारे विभाग, महावितरण, पोलीस आदी विभागांची बैठक बोलावली आहे.या बैठकीत जिल्हा प्रशासनाने विष्णूपुरीतून होणारा अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या विशेष पथकांचाही आढावा घेतला जाणार आहे.इसापूरचे पाणी पोहोचणारपर्यायी पाणीपुरवठा योजनेसाठी सांगवी बंधाºयात इसापूर प्रकल्पाचे पाणी २४ एप्रिल रोजी सोडण्यात आले आहे. हे पाणी २५ एप्रिल रोजी सांगवी बंधाºयात पोहोचणार आहे. या पाण्यातून उत्तर नांदेडची जवळपास २५ दिवसांची तहान भागणार आहे. यामुळे विष्णूपुरीतून उपसा कमी होणार आहे.