शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सात गटविकास अधिका-यांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 01:26 IST

जलयुक्त शिवार योजनेच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत जिल्ह्यातील अर्धापूर, भोकर, बिलोली, किनवट, मुखेड, नायगाव आणि नांदेड तालुक्याच्या गटविकास अधिका-यांना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

अनुराग पोवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जलयुक्त शिवार योजनेच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत जिल्ह्यातील अर्धापूर, भोकर, बिलोली, किनवट, मुखेड, नायगाव आणि नांदेड तालुक्याच्या गटविकास अधिका-यांना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत दुसºया टप्प्यात १८३ गावांत ५ हजार ४२४ कामे प्रस्तावित आहेत. त्यासाठी ८३ कोटी ४६ लाख रुपये लागणार आहेत. या आराखड्यांना विभागीय आयुक्तांनी मान्यता दिल्यानंतर ३ हजार ३०१ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ३ हजार ३०१ कामांना तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यात मंजूर झालेल्या ३८९ कामांची निविदा प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे. विविध विभागांकडून आजघडीला ८७१ कामे सुरू आहेत तर आजतागायत ५३० कामे पूर्ण झाली आहेत. संपूर्ण मराठवाड्याचा विचार करता नांदेड जिल्हा उस्मानाबादनंतर दुसºया क्रमांकावर आहे.जलयुक्तची कामे पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी डोंगरे यांनी लक्ष केंद्रित करताना दरमहा या योजनेच्या कामाचा आढावा घेतला जात आहे. झालेल्या कामाची आॅनलाईन माहिती छायाचित्रासह संकेतस्थळावर अपलोड केली जात आहे. मात्र काही तालुक्यांतून या सर्व बाबींना छेद दिला जात असल्याची बाब निदर्शनात आली. वारंवार हा प्रकार होत असल्याने जिल्हाधिकाºयांनी याची दखल घेत सात तालुक्यांच्या गटविकास अधिकाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कामातील निष्काळजीपणा, बैठकांना अनुपस्थिती या सर्व बाबींचा खुलासा करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. या कारवाईनंतर अधिकाºयांमध्ये खळबळ उडाली असून जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाकडे दुर्लक्ष करणे महागात पडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सर्वाधिक ३ हजार १७६ कामे कृषी विभागाकडून केली जात आहेत. त्याखालोखाल १ हजार ५१७ कामे ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येत आहेत. लघुसिंचन विभागही २२९, वनविभाग १७५, सामाजिक वनीकरण १३५, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा ४४, जि.प. लघु पाटबंधारे १३१, पाटबंधारे व्यवस्थापन १, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा ११ आणि यांत्रिकी विभागाकडून ५ कामे प्रस्तावित आहेत. आतापर्यंत जलयुक्त शिवार योजनेतून ५३० कामे पूर्ण झाली असून कृषी विभागाचे २२४, ग्रामपंचायतीचे २९९, लघुसिंचन १, वनविभाग ४ आणि जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा योजनेची दोन कामे पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेचे ३ कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली.जिल्ह्यात २०१६-१७ मध्ये २२६ गावांत जलयुक्त शिवारचे ८ हजार २२० कामे पूर्ण करण्यात आली आहेत.