शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पाईप चोरी प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही- आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 00:25 IST

महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी चोरीचे पाईप वापरण्यात येत असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आल्यानंतर आता महापालिका प्रशासन या प्रकरणात काय कारवाई करेल याकडे लक्ष लागले आहे़ या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही, असे आयुक्त गणेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी चोरीचे पाईप वापरण्यात येत असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आल्यानंतर आता महापालिका प्रशासन या प्रकरणात काय कारवाई करेल याकडे लक्ष लागले आहे़ या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही, असे आयुक्त गणेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.महापालिकेच्या प्रभाग १४ होळी येथे दलित वस्तीतून होणाºया कामासाठी चोरीचे पाईप वापरले जात असल्याचा सुगावा पोलिसांना लागला़ पोलिसांनी एका व्यक्तीस ५ मार्च रोजी ताब्यात घेतले़ त्याने प्रारंभी माहिती देण्यास टाळाटाळ केली, मात्र पोलिसी खाक्या दाखवताच अन्य एका व्यक्तीचे नाव सांगितले़ विशेष बाब म्हणजे तो व्यक्ती अद्याप इतवारा पोलिसांनाही सापडला नाही़पोलीस तपासात या प्रकरणाची पाळेमुळे खोलवर रूजली असल्याची बाब उघड होताच महापालिकेने सोहेल कन्स्ट्रक्शनला पाईपचे बिल सादर करण्याबाबत नोटीस बजावली़ तर दुसरीकडे तेलंगणातील एल अ‍ॅन्ड टी, मेघा आणि विश्वा या पाईप निर्मिती करणाºया कंपन्यांच्या प्रतिनिधींनी जुन्या नांदेडात सुरू असलेल्या अनेक कामांवर पाहणी करीत सदर पाईप आपल्या कंपनीचे असल्याचे सांगितले़ ते पाईप चोरून आणल्याचे स्पष्ट झाल्यानंतर इतवारा पोलिसांनी जवळपास २०० पाईप जप्त केले आहेत़या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता मोठे रॅकेट या पाईप चोरी प्रकरणातून पुढे येणार आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर महापालिकेनेही आपली बाजू सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ठेकेदार सोहेल कन्स्ट्रक्शनला नोटीस बजावली असली तरी दोन दिवसानंतरही ठेकेदाराकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही. त्याचवेळी सबकॉन्ट्रॅक्टरची प्रक्रियाही सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आयुक्त गणेश देशमुख या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेतात याकडे आता लक्ष लागले आहे. या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झाला नसला तरी घटनास्थळ तेलंगणात असल्याने तेथे गुन्हा दाखल होईल. त्यानंतरच तेलंगणा व नांदेड पोलिसांकडून या प्रकरणाचा खरा तपास सुरू केल्यानंतरच पाईप चोरी प्रकरणात कोणाकोणाचा समावेश आहे, हे उघड होणार आहे.नायगावातही पाईप ?नांदेड महापालिकेच्या पाणी पुरवठा कामासाठी चोरीचे पाईप वापरले जात असल्याची बाब पुढे आली. पोलीस तपासात नायगाव येथेही काही ठिकाणी तेलंगणातील कंपन्याचे पाईप असल्याची माहिती पुढे आली आहे. या माहितीचीही पोलीस शहानिशा करीत आहेत.