शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

‘पैनगंगे'च्या पात्रात आढळल्या अखंड दगडावर नऊ पिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 16:35 IST

विदर्भातील साकूर (पेड) व माहूर तालुक्यातील नेर(पेड) गावाजवळून वाहणार्‍या पैनगंगा नदीपात्रात २०० वर्ष पुरातन महादेवाची पिंड असलेला अखंड कोरीव दगड आढळला.

ठळक मुद्देविदर्भातील साकूर ते श्रीक्षेत्र माहूरगड जाणारी पायवाट पैनगंगा नदीमधून जाते, त्यावर रोज हजारो लोक माहूरला ये-जा करतात.काही महिला नेर या गावी मजुरीकरिता जात असताना सीताबाई यांची नजर पैनगंगा नदीतील एका दगडावर गेली. त्यांना तिथे एक अखंड दगडावर पिंडीचा आकार दिसला.

श्रीक्षेत्र माहूर : विदर्भातील साकूर (पेड) व माहूर तालुक्यातील नेर(पेड) गावाजवळून वाहणार्‍या पैनगंगा नदीपात्रात २०० वर्ष पुरातन महादेवाची पिंड असलेला अखंड कोरीव दगड आढळला. दगडावर नऊ पिंड व नंदी कोरलेले स्पष्ट दिसत आहे. ते बाराजोर्तिलिंग असल्याचा अंदाज पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिकांनी वर्तविला आहे. विदर्भातील साकूर ते श्रीक्षेत्र माहूरगड जाणारी पायवाट पैनगंगा नदीमधून जाते, त्यावर रोज हजारो लोक माहूरला ये-जा करतात. १० फेब्रुवारीला नेहमीप्रमाणे साकूर येथील महिला सीताबाई गेडामसह काही महिला नेर या गावी मजुरीकरिता जात असताना सीताबाई यांची नजर पैनगंगा नदीतील एका दगडावर गेली. त्यांना तिथे एक अखंड दगडावर पिंडीचा आकार दिसला. पिंडीचे दर्शन झाल्याचा आनंद त्यांनी गावातील लोकांना बोलून दाखवला.  गावातील नागरिकांनी पिंड पाहण्यासाठी एकच गर्दी केली. त्या दगडाची साफसफाई गावकर्‍यांनी केली. तेव्हा एक दोन नाही तर तब्बल नऊ पिंड व नंदी स्पष्ट आढळल्याने आता या ठिकाणी बाराजोतिर्लींग असल्याची चर्चा सुरु झाली. 

यावर्षी पावसाळा कमी झाल्यामुळे नदीला पूर आला नाही व होती ती वाळू अवैध उपसा झाली़ त्यामुळे नदी पात्रातील संपूर्ण पाणी आटल्याने तसेच रेतीचा उपसा झाल्याने आतील दगड प्रथमच पूर्ण उघडे पडले आहे. सुरुवातीला नदीचे पात्र लहान असताना हे कोरलेले असावे, असा अंदाज आहे. ते किती पुरातन असू शकते, हे सांगणे कठीण असल्याचे गावातील ज्येष्ठ नागरीकांनी सांगितले़ नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जत्रा भरत आहे़ लिंबायत, नेर, साकूर, टाकळी येथील भाविकांनी येथे महाप्रसाद सुरू केला.  मराठवाडा-विदर्भाच्या मधोमध असलेल्या या ठिकाणी दररोज लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत़ प्रथमच हे ठिकाण आढळल्याचे गावातील मुकेश चंगडे, आनंद चुंगडे, दवणे यांनी सांगितले.

टॅग्स :Nandedनांदेड