शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना प्रादुर्भावातही नांदेडकरांचा विमानप्रवास सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 16:55 IST

नांदेडमध्ये २०१९ मध्ये १ लाख १८ हजार प्रवाशांनी हवाई सेवेचा लाभ घेतला होता. २०२० मध्ये हीच संख्या १ लाख ३७ हजारांवर पोहोचली.

ठळक मुद्देदेशांतर्गत प्रवासी संख्येत घटनांदेडमध्ये मात्र वाढ

- विशाल सोनटक्के

नांदेड : कोरोना प्रादुर्भावामुळे मागील वर्षी राज्यातील देशांतर्गत विमान सेवा मोठ्या प्रमाणात खंडित झाली होती. त्यामुळेच राज्यातील हवाई प्रवासी संख्येतही २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये घट झाली आहे; मात्र त्यानंतरही शिर्डी, कोल्हापूरसह नांदेड येथील प्रवासी संख्या वाढली. नांदेडमध्ये २०१९ मध्ये १ लाख १८ हजार प्रवाशांनी हवाई सेवेचा लाभ घेतला होता. २०२० मध्ये हीच संख्या १ लाख ३७ हजारांवर पोहोचली.

कोरोना प्रादुर्भाव वाढल्यामुळे मागील वर्षी अनेक ठिकाणची देशांतर्गत सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळेच हवाई प्रवाशांच्या संख्येवर त्याचा मोठा परिणाम झाल्याचे दिसून येते. २०१९ मध्ये राज्यात १ कोटी ४६ लाख ३३ हजार प्रवाशांनी देशांतर्गत विमान सेवेचा लाभ घेतला होता. २०२० मध्ये या प्रवासी संख्येत घट झाली असून, ती संख्या १ कोटी २५ लाखांवर आहे. मात्र अशा विपरित परिस्थितीतही नांदेडमधील हवाई प्रवाशांची संख्या वाढल्याचे सकारात्मक चित्र आहे.

नांदेड विमानतळावरून सध्या एअर इंडियाची नांदेड-अमृतसर, नांदेड-दिल्ली आणि नांदेड-चंदीगड ही प्रवासी सेवा सुरू आहे, तसेच नांदेड-हैद्राबाद व नांदेड-मुंबई अशी टू जेटच्या माध्यमातून दररोज सेवा आहे. नांदेड येथे सचखंड गुरुद्वारा असल्याने दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक नांदेडला येतात. तसेच हिंगोली, परभणी, यवतमाळ व लातूर या जिल्ह्यातील नागरिकही नांदेड येथूनच विमान प्रवासास पसंती देत असल्याने नांदेडमधील हवाई प्रवाशांची संख्येत भर पडली.

औरंगाबादेतील प्रवासी संख्येतही किंचित घट२०१९ मध्ये शिर्डी विमानतळावरून २ लाख २९ हजार प्रवाशांनी उड्डाण घेतले होते. यात २०२० मध्ये वाढ झाली असून, ५ लाख ६९ हजार प्रवाशांनी विमानसेवेचा लाभ घेतला. कोल्हापूरमध्येही २०१९ मध्ये १८ हजार प्रवाशांनी विमानसेवेला प्राधान्य दिले. यात वाढ होत २०२० मध्ये १ लाख ३१ हजारावर प्रवासी संख्या पोहोचली. नाशिक ओझर येथून २०१९ मध्ये ४४ हजार प्रवाशांनी उड्डाण घेतले होते. २०२० मध्ये ही संख्या १ लाख २ हजारांवर पोहोचली. दुसरीकडे मुंबई, पुण्यासह औरंगाबादेतील देशांतर्गत प्रवासी संख्येत २०१९ च्या तुलनेत घट झाली. २०१९ मध्ये औरंगाबाद येथील ३ लाख ४७ हजार प्रवाशांनी विमानसेवेचा लाभ घेतला. २०२० मध्ये ही संख्या ३ लाख ४६ हजार झाली आहे.

टॅग्स :Nandedनांदेडairplaneविमानtourismपर्यटन