शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नांदेडकरांना तीन दिवसांआड पाणी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 23:57 IST

विष्णूपुरी प्रकल्पातून होणारा अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी प्रकल्प परिसरातील विद्युत रोहित्र बंद करण्याबाबत महावितरणला वारंवार कळवूनही त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने शहरावर मे महिन्यानंतर जलसंकट उद्भवण्याची भीती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देमहावितरणला मनपाचे आणखी एक पत्र

नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पातून होणारा अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी प्रकल्प परिसरातील विद्युत रोहित्र बंद करण्याबाबत महावितरणला वारंवार कळवूनही त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने शहरावर मे महिन्यानंतर जलसंकट उद्भवण्याची भीती निर्माण झाली आहे. महापालिकेने आता शहरवासीयांना तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याची तयारी केली आहे.विष्णूपुुरी प्रकल्पात सध्या २४.५१ दलघमी पाणीसाठा शिल्लक असून तो मे अखेरपर्यंत पुरण्याची शक्यता आहे. नांदेड शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या विष्णूपुरीतून प्रतिदिन ०.४१ दलघमी पाण्याचा उपसा होत आहे. याच वेगाने पाणी उपसा सुरु राहिल्यास मे अखेरपर्यंत विष्णूपुरी प्रकल्प कोरडा होईल, अशी शक्यता आहे.दुसरीकडे, जिल्हा प्रशासनाने प्रकल्पातून अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी स्थापन केलेल्या पथकांनी गाशा गुंंडाळला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाण्याच्या विषयावर जोरदार चर्चा झाली होती. त्या चर्चेत पथकांचा विषय आला होता. ही पथके कार्यान्वित करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला विनंती केली जाईल, असे प्रशासनाने सांगितले होते. मात्र अद्यापही ही पथके कार्यान्वित झाली नाहीत. त्यामुळे उपसा सुरुच आहे.दुसरीकडे महावितरणनेही प्रकल्प परिसरात असलेले विद्युत रोहित्र बंद करण्याच्या कारवाईबाबत ‘हात’ वर केले आहेत. महापालिकेने दोन दिवसांपूर्वीच महावितरणला आणखी एक पत्र लिहून सदर भागातील अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी विद्युत रोहित्र बंद करण्याबाबत कारवाई करावी, असे कळविले आहे.जिल्ह्यात लहान-मोठे १०६ प्रकल्प आहेत. त्यात मानार, विष्णूपुरी या दोन मोठ्या प्रकल्पांसह ९ मध्यम प्रकल्प, ३ उच्च पातळी बंधारे, ८८ लघु प्रकल्प, ४ कोल्हापुरी बंधाऱ्यांचा समावेश आहे. मानार प्रकल्पाची साठवणक्षमता १४६.९२ दलघमी असून उपयुक्त साठा १३८.२१ दलघमी आहे. सद्य:स्थितीत या प्रकल्पात केवळ ३४ दलघमी पाणी उरले आहे. नांदेड शहराची तहान भागवणाऱ्या विष्णूपुरी प्रकल्पाची साठवणक्षमता ८३.५ दलघमी असून ८०.७९ दलघमी साठा उपयुक्त आहे. सध्या विष्णूपुरी प्रकल्पात २४.९ दलघमी वापरायोग्य पाणी उरले आहे. जिल्ह्यातील ९ मध्यम प्रकल्पात १७९.९८ दलघमी पाणी साठवता येते. या प्रकल्पात आजघडीला केवळ १३.९० दलघमी पाणी शिल्लक आहे. ही आकडेवारी पाहता मध्यम प्रकल्प गाळात रुतले म्हटल्यास वावगे ठणार नाही. गोदावरी नदीवरील ३ उच्च बंधाºयात १२१.७० दलघमी पाणी साठवण्याची क्षमता आहे. सध्या या बंधाºयात २०.६ दलघमी पाणी आहे. लहान-मोठ्या ८८ लघू प्रकल्पांची साठवणक्षमता २१६.४५ दलघमी असून उपयुक्त पाणीपातळी १९१.६ आहे. विविध लघु प्रकल्पात सध्या २८.६७ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. ४ कोल्हापुरी बंधाऱ्यांची साठवणक्षमता ६.८२ दलघमी असून एकाही प्रकल्पात पाण्याचा थेंब नाही.सोमवारी महापालिकेची अर्थसंकल्पीय सभासोमवारी महापालिकेची अर्थसंकल्पीय सभा होणार आहे. या सभेत पाणीप्रश्नावर चर्चा होण्याची शक्यता आहे. एकीकडे प्रशासनाकडून तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याची तयारी केली जात आहे. त्याचवेळी महापालिकेला इतर विभागाकडून मात्र असहकार्य होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा फटका शहरवासीयांना मे नंतर बसू शकतो. विशेष म्हणजे, पर्यायी पाणी उपलब्ध करणेही यावर्षी अशक्य आहे. येलदरी, सिद्धेश्वर हे प्रकल्प कोरडे पडले आहेत. दिग्रस बंधा-यातूनही यापूर्वीच विष्णूपुरीत पाणी घेण्यात आल्याने पाणी आणायचे कुठून ? हा प्रश्न आहे.

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाvishnupuri damविष्णुपुरी धरणwater scarcityपाणी टंचाई