शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

नांदेडात पेट्रोल ८५ रुपयांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 01:04 IST

मार्च महिन्यांपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत होती़ मे महिन्यात नांदेडात पेट्रोलचे प्रति लिटरचे दर ८७ रुपये ७० पैशाच्या उच्चांकावर गेले होते़ परंतु गेल्या काही दिवसात इंधनाचे दर काही पैशांनी कमी झाले आहेत़ रविवारी नांदेडात पेट्रोल प्रति लिटर ८५ रुपये होते़ मे महिन्याच्या तुलनेत हे दर २ रुपये ७० पैशांनी कमी आहेत़ परंतु हे दर आणखी कमी व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे़

ठळक मुद्देमे च्या तुलनेत पावणेतीन रुपये स्वस्त

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड :मार्च महिन्यांपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत होती़ मे महिन्यात नांदेडात पेट्रोलचे प्रति लिटरचे दर ८७ रुपये ७० पैशाच्या उच्चांकावर गेले होते़ परंतु गेल्या काही दिवसात इंधनाचे दर काही पैशांनी कमी झाले आहेत़ रविवारी नांदेडात पेट्रोल प्रति लिटर ८५ रुपये होते़ मे महिन्याच्या तुलनेत हे दर २ रुपये ७० पैशांनी कमी आहेत़ परंतु हे दर आणखी कमी व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे़आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या दरात वाढ झाल्यानंतर देशभरात इंधन दरवाढीचा भडका उडाला़ कर्नाटक निवडणुकीच्या काळात सरकारने इंधन दरवाढ केली नव्हती़ निवडणुका संपताच मात्र दरवाढीचा शॉक देण्यात आला़ साधारणता मार्च महिन्यापासून दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत होती़ दररोज काही पैशांनी होणारी ही वाढ मात्र सर्वसामान्यांना मेटाकुटीला आणणारी ठरली़ २६ मे रोजी नांदेडात पेट्रोलचे दर ८७़२५ पैसे तर डिझेल ७३़६८ पैसे होते़ त्यानंतर २७ मे पेट्रोल-८७़४०, डिझेल-७३़८४, २८ मे पेट्रोल-८७़५४, डिझेल-७३़९६, ३० मे पेट्रोल-८७़६९, डिझेल-७४़०९, १ जून रोजी पेट्रोल-८७़५६, डिझेल-७३़९९, ३ जून-पेट्रोल-८७़३९ व डिझेलचा दर ७३़८९ पैशावर होता़ त्यानंतर अनेक राजकीय पक्षांनी आंदोलने केली़ट्रान्सपोर्ट संघटनेनेही चक्काजामचा इशारा दिला होता़ त्यात जुलै महिन्यात मात्र महागाईने होरपळणाऱ्या नागरीकांना थोडा का होईना दिलासा मिळाला आहे़ २ जुलै रोजी पेट्रोल-८४़४३, डिझेल-७१़८६, ३ जुलै-पेट्रोल-८४़४३, डिझेल-७१़८६, ४ जुलै पेट्रोल-८४़४३, डिझेल-७१़८६, ५ जुलै पेट्रोल-८४़५९, डिझेल-७१़९८, ६ जुलै पेट्रोल-८४़७२, डिझेल-७२़१५, ७ जुलै पेट्रोल-८४़८५, डिझेल- ७२़२५ तर रविवारी पेट्रोल-८५ रुपये तर डिझेलचे दर ७२़३६ पैशावर पोहचले होते़ गेल्या चार दिवसात इंधनाच्या दरात काही पैशांची वाढ करण्यात आली आहे़येत्या काही दिवसात इंधनामध्ये अशाप्रकारे चढ-उतार होण्याची शक्यता पेट्रोल पंप चालक वर्तवित आहेत़ दरम्यान, वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे राज्य परिवहन महामंडळासह खाजगी ट्रव्हसल्स चालकांनीही आपल्या तिकीट दरात मोठी वाढ केल्याचे दिसून आले़---स्कुल बस चालकांनी दिला होता भाडेवाढीचा इशारापेट्रोलच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्यामुळे शहरात धावणाºया स्कुल बस चालकांनी नवीन शैक्षणिक वर्षापासून भाडेवाढ करण्याचा इशारा दिला होता़ या भाडेवाढीबाबत पालकांनी संताप व्यक्त केला होता़

टॅग्स :NandedनांदेडPetrolपेट्रोल