शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडला़ ‘अवकाळी’ने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 00:24 IST

शहरासह जिल्ह्यात बहुतांश भागात रविवारी सायंकाळी साडेसात ते आठ वाजेदरम्यान अवकाळी पावसाने झोडपले़ नांदेडात जवळपास अर्धा तास झालेल्या धो-धो पावसाने रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. वादळी वा-यामुळे बहुतांश भागातील वीजपुरवठा खंडित झाला़

ठळक मुद्देशहरात धो-धो : जिल्ह्यातील बहुतांश भागात वादळी वा-यासह पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहरासह जिल्ह्यात बहुतांश भागात रविवारी सायंकाळी साडेसात ते आठ वाजेदरम्यान अवकाळी पावसाने झोडपले़ नांदेडात जवळपास अर्धा तास झालेल्या धो-धो पावसाने रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. वादळी वा-यामुळे बहुतांश भागातील वीजपुरवठा खंडित झाला़दोन दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलानंतर शनिवारी सायंकाळी पावसाचे काही भागात आगमन झाले़ तर रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते़ त्यातच सायंकाळी वादळी वा-यासह पावसाने हजेरी लावली़ दरम्यान, सात वाजेच्या सुमारास वादळी वा-यासह अवकाळी पावसाने शहरास झोडपले़ अचानक झालेल्या पावसामुळे रविवारची सुटी साजरी करण्यासाठी सायंकाळी घराबाहेर पडलेल्या चाकरमान्यांची मोठी धांदल उडाली़वादळी वाºयासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणचे होर्डिंग्ज रस्त्यावर पडले होते़ तर सखल भागात पाणी साचले होते़ अर्धा ते पाऊण तास झालेल्या धो-धो पावसाने सायंकाळी शहरात असलेल्या लग्न सोहळ्यातील सर्वांचीच धांदल उडाली़वाºयामुळे अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या तुटून पडल्या़ कंधार तालुक्यातील कौठा परिसरात तसेच लोहा, गडगा, कुरूळा, नरसी फाटा, पिंपळगाव येवला, वन्नाळी, मुक्रमाबाद आदी भागातही अवकाळी पावसाने हजेरी लावली़१४ व १५ मार्चदरम्यान पाऊस होण्याची शक्यतासध्या मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार असून येत्या दोन ते तीन दिवसांत यात अधिक वाढ होईल़ तसेच दोन दिवसांत चक्रीय कमी दाबाचे क्षेत्रात रूपांतर होईल़ पश्चिम-उत्तर दिशेला अरबी समुद्राच्या दिशेला हा कमी दाबाचा पट्टा १४ व १५ मार्चदरम्यान सरकेल़ याचा परिणाम म्हणून दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असा अंदाज खगोलशास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केला.