शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीराम मंदिर बांधणे सोपे होते, पण मॅकॉले प्रेरित गुलामीची मानसिकता..; PM मोदींनी पुन्हा 'तो' मुद्दा काढला
2
Anant Garje : "अनैतिक संबंध ठेवणारी महिला...", रुपाली पाटील ठोंबरे यांची गौरी पालवे मृत्यू प्रकरणी संतप्त पोस्ट
3
मुस्कान रस्तोगी बनली आई, पण तुरुंगामध्ये जन्मलेल्या मुलांचा सांभाळ कसा केला जातो, कोणत्या सुविधा असतात?
4
हुंड्याला नकार! वराने थेट २१ लाख रुपये लग्न मंडपातच परत केले; पाहुणे बघतच राहिले, वधू भावूक
5
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! गुंतवणूकदारांचे ३३,००० कोटी पाण्यात! 'हे' ठरले टॉल लूजर्स
6
हे भगवान...! २६ हजार कोटींची मालकीण करणार एका चहावाल्याशी लग्न; उद्योगजगतात खळबळ...
7
मार्च पर्यंत ४००० अब्ज डॉलर्सची होणार देशाची अर्थव्यवस्था; कोणी केला हा दावा, पाहा
8
IND vs SA 2nd Test Day 4 Stumps : दोन्ही सलामीवीर तंबूत! कुलदीपला चौथ्या क्रमांकावर पाठवण्याची वेळ!
9
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला; ९ निष्पाप बालकांसह १० जणांचा मृत्यू
10
डेली SIP की मासिक SIP? म्युच्युअल फंडात जास्त फायदा कशात? गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांचा खास सल्ला
11
उद्धव ठाकरेंनी घेतली संजय राऊतांची भेट, केली तब्येतीची विचारपूस; म्हणाले, “आता लवकरच...” 
12
रिलायन्सचा वर्षात २७ टक्क्यांचा दमदार परतावा! भविष्यात किती वाढ होईल?, ब्रोकरेज फर्मने दिलं टार्गेट
13
आधी पत्नीला संपवलं, नंतर पतीने स्वतःही घेतला जगाचा निरोप; मरणापूर्वी भिंतीवर लिपस्टिकने लिहिली संपूर्ण कहाणी!
14
शनी देव कोपला? भव्य कडे अचानक दिसेनासे झाले; काय आहे दुर्मीळ खगोलीय घटनेमागील रहस्य?
15
कमी मार्क मिळाले म्हणून आई-वडील ओरडले, रागाच्या भरात १०वीतील मुलगी छतावर गेली अन्...
16
Yashasvi Jaiswal : खेळ मांडला! यशस्वीला गोलंदाजीची हाव; फलंदाजी वेळी मात्र आपली जबाबदारी विसरला!
17
इथे २०२५ नाही, २०१८ आहे, सूर्योदय १२ वाजता होतो; ज्वालामुखीची राख याच देशातून भारतात आली
18
स्त्रियांसाठी स्वतःचेच घर बनलेय सर्वात धोकादायक ठिकाण! प्रत्येक १० मिनिटाला महिलेची जवळच्याच माणसाकडून झाली हत्या
19
Priyanka Chaturvedi: भाजलेल्या चण्यांमध्ये 'कर्करोगजन्य' विषारी केमिकल? प्रियंका चतुर्वेदींचं केंद्रीय मंत्र्यांना पत्र!
20
आयटी इंजिनिअर नोकरी गमावली, होम लोनचा हप्ता भरण्यासाठी थेट रॅपिडो ड्रायव्हर बनला!
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जि.प. शिक्षण विभागाचे निघाले वाभाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:24 IST

जिल्हा परिषदेच्या मोडकळीस आलेल्या २५ हजार प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या इमारतीचे स्ट्रक्चर आॅडिट पुढील १५ दिवसांत करून अहवाल सादर करण्याच्या सूचना करीत शिक्षण विभागातील अनियमितता तसेच विविध प्रस्तावांना मिळालेल्या मंजुरीला सर्वसाधारण सभेत स्थगिती देण्यात आली़

ठळक मुद्देमोडकळीस आलेल्या शाळा इमारतीचे होणार सर्वेक्षण सहा तास सभेचे कामकाज

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्हा परिषदेच्या मोडकळीस आलेल्या २५ हजार प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या इमारतीचे स्ट्रक्चर आॅडिट पुढील १५ दिवसांत करून अहवाल सादर करण्याच्या सूचना करीत शिक्षण विभागातील अनियमितता तसेच विविध प्रस्तावांना मिळालेल्या मंजुरीला सर्वसाधारण सभेत स्थगिती देण्यात आली़जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी जि़ प़ अध्यक्षा शांताबाई पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली़ यावेळी शिक्षण विभागातील सावळा गोंधळ जि़ प़ सदस्यांनी सभेसमोर आणला़ मागील काही दिवसांपासून शिक्षण विभागातील अनेक विषय चर्चेत आले आहेत़ या विषयांना सभेत मांडून सदस्यांनी संबंधित अधिकारी, पदाधिका-यांना कोंडीत पकडले़ शिक्षण विभागातील अनेक संचिका गहाळ झाल्याची माहिती सदस्यांनी दिल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी या संचिकांची माहिती घेण्यात येईल, असे सांगितले़ दरम्यान, सदस्य मनोहर शिंदे, साहेबराव धनगे यांनी मुख्याध्यापकांच्या नियुक्तीचे आदेश रात्रीतून बदलल्याप्रकरणी शिक्षण सभापती तसेच माध्यमिकचे शिक्षणाधिकारी यांच्यावर आरोप केले़जिल्ह्यातील वाडी, वस्ती, तांंड्यावरील तसेच ग्रामीण भागातील अनेक शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत़ या धोकादायक इमारतीत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत़ या इमारतींचे स्ट्रक्चर आॅडिट करण्याची तसेच नवीन इमारतीच्या बांधकामासाठी निधीची मागणी जि़ प़ सदस्या पूनम पवार, मीनल खतगावकर, प्रणिता पाटील चिखलीकर, प्रवीण पाटील चिखलीकर, मनोहर शिंदे, चंद्रसेन पाटील, बबन बारसे आदींनी केली़ पूनम पवार यांनी मोडकळीस आलेल्या शाळांच्या इमारतीच्या संदर्भात मागील अनेक दिवसांपासून पाठपुरावा केला आहे़ काही धोकादायक इमारतीचे फोटोही त्यांनी सभागृहात सादर केले़ गडगा येथील जिल्हा परिषदेची शाळा १९३५ मधील असून ही इमारत अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्याचे त्यांनी सांगितले़ मीनल खतगावकर यांनीही हा विषय अत्यंत गंभीर असून नवीन शाळा इमारतीसाठी लागणाºया निधीची तरतूद करावी, असे सांगितले़ मुख्य कार्यकारी अधिकारी शिनगारे यांनी मोडकळीस असलेल्या इमारतींच्या शाळांची यादी तयार करून ती शिक्षण विभागाला सादर करण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले़ शिक्षण सभापती माधवराव मिसाळे गुरूजी यांनी मोडकळीस आलेल्या इमारतींची पाहणी केल्याचे व नवीन इमारतीसाठी लागणारा निधी उपलब्ध नसल्याचे सांगितले़ ते म्हणाले, शाळा दुरूस्तीसाठी केवळ ३५ लाख रूपयेच निधी मिळाले आहेत़शिक्षण विभागातील अतिरिक्त शिक्षकांचा तसेच समायोजित शिक्षक व रिक्त पदांचा विषय जि़ प़ सदस्य संजय बेळगे, दशरथ लोहबंदे यांनी उपस्थित केला़ अनेक शाळेत मुलांची संख्या कमी असून शिक्षकांच्या संख्या अधिक आहेत, अशा शिक्षकांचे अद्यापही समायोजन झाले नाही़तर काही शाळेत विषयांना शिक्षक मिळत नसल्याचे विदारक चित्र असल्याचे बेळगे यांनी सांगितले़ पटसंख्या कमी असलेल्या शाळांची मान्यता रद्द करून अशा शाळांचे स्थलांतर करण्यात येणार आहे़ जिल्ह्यातील ५७ शाळा कमी पटसंख्या असलेल्या आहेत़ या शाळांच्या संदर्भात सदस्यांनी चर्चा केली़ प्रणिता चिखलीकर यांनी केंद्र प्रमुखांवर कोणाचेही नियंत्रण राहिले नसल्याचे सांगितले़ तर मीनल खतगावकर यांनी केंद्र संमेलन होत नसल्याने त्या भागातील जि़प़ सदस्यांना शाळांच्यासंदर्भात कोणतीच माहिती मिळत नसल्याचे सांगितले़ शिक्षण विभागाला पूर्णवेळ शिक्षणाधिकारी कधी मिळणार, असा प्रश्नही सदस्यांनी विचारला़ तेव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी शिनगारे यांनी लवकर पूर्णवेळ शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकाºयांची पदे भरली जातील, असे सांगितले़अर्धा तास सर्वसाधारण सभा तहकूबसर्वसाधारण सभा सुरू होताच सदस्यांनी अभ्यासासाठी सभा अहवाल न मिळाल्याने अर्धा तास सभा तहकूब केली़ सभेच्या आयोजनाची नोटीस मिळत नसल्याने तसेच सभा अहवाल सभागृहातच मिळत असल्याने सदस्यांनी राग व्यक्त केला़ बुधवारी सभेला सुरू होताच सभा अहवालाचा अभ्यास करण्यासाठी अर्धा तास सभा तहकूब करावी, असा ठराव जि़ प़ सदस्य अ‍ॅड़ धोंडगे यांनी मांडला़उपमुख्य कार्यकारी अधिकारी सभेचे सचिव राजेंद्र तुबाकले यांनी सभा नियमांची आठवण करून दिली़ सभेत प्रश्न मांडण्यासाठी १५ दिवस अगोदर ते प्रशासनाकडे देणे आवश्यक असल्याचे सांगितले़ तेव्हा सदस्यांनी जोरदार आक्षेप घेत अधिका-यांसाठी नियम नाहीत का, असा जाब विचारला़ सीईओ शिनगारे यांनी सर्व सदस्यांना सभेची नोटीस व अहवाल १५ दिवस अगोदर देण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या़

शिक्षणाधिका-यांच्या निर्णयाला सीईओंनी दिली स्थगितीशिक्षणाधिकारी बळवंत जोशी यांनी पुणेगाव येथील संजय गांधी शाळा व नांदेड येथील वसंतनगरच्या राजर्षी शाहू शाळेतील मुख्याध्यापकांना पदावरून काढण्याचे प्रकरण सभागृहात चांगलेच गाजले़ सदस्यांनी हा विषय सभागृहात लावून धरला़ रात्री ११ च्या सुमारास शिक्षणाधिकारी जोशी यांनी संबंधित निर्णयास मंजुरी दिली असून याप्रकरणी दिलेले आदेश रद्द करण्याची मागणी सदस्यांनी केली़ शिक्षणाधिकाºयांनी घेतलेल्या अनेक प्रकरणांत अनियमितता असून याचीही चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली़ तेव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी या निर्णयास स्थगिती देवून विविध प्रकरणांची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त करण्याचे आदेश दिले़ सभेला जि़प़ उपाध्यक्ष समाधान जाधव, सभापती शीला निखाते, सभापती मधुमती देशमुख, सभापती दत्तात्रय रेड्डी, सभापती माधवराव मिसाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, प्रकल्प संचालक एऩ एक़ुरेशी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अप्पासाहेब चाटे, कोंडेकर आदी उपस्थित होते़