शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

नांदेडमध्ये ट्रकसह स्कूल बसचा चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 00:52 IST

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने होणारी वाढ, बेहिशेबी टोलवसुली, विमा उतरविण्यासाठी लागणारी रक्कम यासह इतर मागण्यांसाठी मालवाहतूकदार संघटनेने शुक्रवारी देशव्यापी चक्काजामची हाक दिली होती़ त्याला नांदेडातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून जवळपास ३ हजार ट्रकचालकांनी चक्काजाम केला़ तर या आंदोलनाला पाठिंबा म्हणून स्कूल बस चालकांनीही एक दिवशीय संप पुकारला़

ठळक मुद्देइंधन दरवाढीचा निषेध : १३८० स्कूल बस जागेवर, ३ हजार ट्रकचालक संपात

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने होणारी वाढ, बेहिशेबी टोलवसुली, विमा उतरविण्यासाठी लागणारी रक्कम यासह इतर मागण्यांसाठी मालवाहतूकदार संघटनेने शुक्रवारी देशव्यापी चक्काजामची हाक दिली होती़ त्याला नांदेडातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून जवळपास ३ हजार ट्रकचालकांनी चक्काजाम केला़ तर या आंदोलनाला पाठिंबा म्हणून स्कूल बस चालकांनीही एक दिवशीय संप पुकारला़नांदेड जिल्हा मोटर मालक संघटनेच्या वतीने सकाळी दहा वाजता माळटेकडी चौरस्त्यावर चक्काजाम आंदोलन केले़ या आंदोलनामुळे माळटेकडी ते भोकर फाटा अशा तीन किमीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या़ तर माळटेकडी ते धनेगावपर्यंतही रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या़ आंदोलनात नांदेड जिल्हा मोटर मालक संघटनेचे अध्यक्ष सुखविंदरसिंघ हुंदल, भूपेंद्रसिंग रंगी, हरपालसिंघ गुलाटी, भागेंद्रसिंग गुलाटी, जोगेंद्रसिंग खैरा, कालासिंग खैरा, निमासिंग संधू, फारुख, माजीद खान, सोनूसिंह परमार, गुरमितसिंग खैरा, विशाल होळकर, निर्मलसिंग फौजी, मारोती शिंदे, पप्पूसिंग संधू, ओ़पी़भाटीया, स्वरुपसिंग आदींचा समावेश होता़दरम्यान, जवळपास दोन तास चाललेल्या या चक्काजाम आंदोलनामुळे इतर वाहनधारकांची मात्र मोठी गैरसोय झाली़ यावेळी दोन्ही रस्त्यांवर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता़----सर्व प्रकारच्या वाहनांतून माल वाहतुकीस मुभाविविध मागण्यांसाठी आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस यांनी शुक्रवारपासून माल वाहतूकदारांचे बेमुदत चक्काजाम आंदोलन सुरु केल आहे़ या काळात सर्वसामान्य जनतेची गैरसोय होवू नये यासाठी सर्व प्रकारच्या वाहनांतून, खाजगी वाहनांतून त्याचप्रमाणे कंत्राटी व टप्पा वाहतूक करणाऱ्या बसेसमधून माल वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे़ याबाबत शुक्रवारी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली आहे़ दरम्यान, अत्यावश्यक वस्तूची वाहतूक, पुरवठा यासंदर्भात अडचणी असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष ०२४६२-२३५०७७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे़ तसेच याबाबत उपाययोजना करण्यासाठी समितीची स्थापनाही करण्यात आली आहे़---पाल्यांचे हाल, पालकांची धावपळमाल वाहतूकदारांनी शुक्रवारपासून संप पुकारला आहे़ या आंदोलनाला स्कूल बसचालकांनीही पाठिंबा दर्शविला होता़ त्यामुळे शुक्रवारी जिल्ह्यातील जवळपास १३८० स्कूल बसेस बंदच होत्या़ सकाळी स्कूल बस न आल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल झाले असून पालकांचीही धावपळ उडाली होती़ याचा परिणाम आज बहुतांश शाळांतील पटसंख्येवर झाला होता़पेट्रोल आणि डिझेलची दररोज दरवाढ होत आहे़ त्यामुळेच स्कूल बस चालकांनी नवीन शैक्षणिक वर्षापासून स्कूल बसच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता़ त्यानुसार काही स्कूल बसचालकांनी दरात ५० ते ७५ रुपयांची वाढ केली होती़ परंतु त्यानंतरही दररोज दरवाढ होत असल्यामुळे नुकसान होत असल्याचे स्कूल बसचालकांचे म्हणणे आहे़ प्रत्येकवेळी वाहतूक दरात वाढ केल्यामुळे पालकांच्या रोषाचा सामनाही स्कूल बस चालकांना करावा लागत आहे़ त्यात यापूर्वी स्कूल बसचा विमा काढण्यासाठी ५० ते ६० हजार रुपये लागत होते़ आता तब्बल एक लाखांचा खर्च येत आहे़ त्याचाही फटका बसचालकांना बसत आहे़ तर दुसरीकडे अवैधपणे विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे रिक्षा शहरात अनेक आहेत़ या सर्व विषयांवर शुक्रवारी स्कूल बसचालकांनी शंभर टक्के बंद पाळला़ त्यामुळे सकाळी स्कूल बसची वाट पाहत असलेल्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली़ तर स्कूल बस न आल्यामुळे पाल्यांना शाळेत वेळेवर पोहोचविण्यासाठी पालकांना बरीच धावपळ करावी लागली़ त्यामुळे बहुतांश शाळेतील पटसंख्या आज कमीच भरली़ शनिवारी मात्र सर्व बसेस धावणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे़---नांदेड जिल्हा मोटर मालक संघटनेचे अध्यक्ष सुखविंदरसिंग हुंदल म्हणाले, इंधन दरवाढ कमी करण्याबाबत संघटनेच्या पदाधिकाºयांनी सरकारशी अनेकवेळा बोलणी केली़ परंतु, त्यानंतर दरवाढ कमी करण्यात आली नाही़ आंदोलनात जिल्ह्यातील जवळपास तीन हजार ट्रक मालकांनी सहभाग घेतला़ जिल्ह्यातून दररोज बाहेर पडणाºया एक हजार ट्रकव्या जाण्या-येण्यावरही त्यामुळे परिणाम झाला़नांदेड जिल्हा स्कूल बस, व्हॅन असोसिएशनचे अध्यक्ष निखिल लातूरकर म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने इंधनदरात वाढ होत आहे़ विमा व इतर कागदपत्रांसाठीही मोठी रक्कम मोजावी लागत आहे़ शुक्रवारी पुकारण्यात आलेला संप शंभर टक्के यशस्वी झाला आहे़ पालक व विद्यार्थ्यांच्या गैरसोयीबाबत दिलगिरी व्यक्त करीत असल्याचेही ते म्हणाले़

टॅग्स :NandedनांदेडStrikeसंपBus Driverबसचालक