शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

नांदेडमध्ये घोटाळ्यातील धान्याला फुटले कोंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 00:46 IST

कृष्णूर येथील मेगा अ‍ॅग्रो अनाज कंपनीतील जप्त केलेले धान्य पोलिसांनी पुरवठा विभागाच्या ताब्यात दिले असून दोन दिवसांत जवळपास सहा ट्रकमधील धान्याची मोजदाद करण्यात आली होती़ गेल्या महिनाभरापासून धान्याचे हे ट्रक पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर असल्यामुळे लाखो रुपयांच्या या धान्याला कोंब फुटले आहे़ त्यात पोत्यातील धान्याचे वजनही कमी भरत असल्याची माहिती हाती आली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : कृष्णूर येथील मेगा अ‍ॅग्रो अनाज कंपनीतील जप्त केलेले धान्य पोलिसांनी पुरवठा विभागाच्या ताब्यात दिले असून दोन दिवसांत जवळपास सहा ट्रकमधील धान्याची मोजदाद करण्यात आली होती़ गेल्या महिनाभरापासून धान्याचे हे ट्रक पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर असल्यामुळे लाखो रुपयांच्या या धान्याला कोंब फुटले आहे़ त्यात पोत्यातील धान्याचे वजनही कमी भरत असल्याची माहिती हाती आली आहे़मेगा अ‍ॅग्रो अनाज कंपनीवर पोलिसांच्या छाप्याला महिना उलटला आहे़ जप्त केलेले धान्य नेमके कुठे आहे? याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना पत्र दिले होते़ त्यानंतर पोलिसांनी सोमवारी जप्त केलेले धान्य पुरवठा विभागाच्या ताब्यात दिले़ पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ठेवण्यात आलेल्या दहा ट्रकपैकी मंगळवार सायंकाळपर्यंत आठ ट्रक खुपसरवाडी येथील शासकीय गोदामात नेण्यात आले होते़ या ठिकाणी इन कॅमेरा या धान्याची उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांच्यासह सहा सदस्यीय चौकशी समितीसमोर मोजदाद करण्यात येत आहे़ त्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांचाही समावेश आहे़सोमवारी पहिल्या दिवशी तीन ट्रकमधील धान्याची मोजदाद करण्यात आली होती़ त्यानंतर मंगळवारी आणखी तीन ट्रकमधील धान्याची मोजदाद करण्यात येत होती़ विशेष म्हणजे, गेले महिनाभर हे ट्रक मुख्यालयाच्या मैदानावर उघड्यावरच होते़ त्यामुळे गव्हाला ओल लागल्यामुळे कोंब फुटले आहे़ या ट्रकमधील गव्हाच्या अनेक पोत्यांना कोंब फुटल्याचे तपासणीत आढळून आले़तर दुसरीकडे धान्याच्या वजनामध्येही घट झाल्याची माहिती हाती आली आहे़ अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी या धान्याची तपासणी करीत आहेत़ एका ट्रकमध्ये जवळपास तीनशे पोती असल्याचे मोजदाद करताना स्पष्ट झाले आहे़ त्यामुळे जप्त केलेली पोती नेमकी किती? जप्त धान्य किती प्रमाणात खराब झाले? हे मोजदाद पूर्ण झाल्यानंतरच समोर येईल़ट्रक सुरु करण्यासाठी गाळला घामपोलिसांनी १८ जुलैला कृष्णूरच्या गोदामावर छापा मारुन धान्याचे दहा ट्रक जप्त केले होते़ त्यानंतर हे ट्रक पोलिसांच्याच ताब्यात होते़ गेल्या महिनाभरापेक्षा अधिक काळापासून हे ट्रक जागचे हलले नसल्यामुळे त्यांच्या बॅटºया पूर्णपणे उतरल्या होत्या़ त्यामुळे हे ट्रक शासकीय गोदामात नेण्यासाठी सुरु करताना कर्मचाºयांना घाम गाळावा लागला़

धान्याचे वितरण प्रतिनिधीमार्फतशासकीय धान्याची वाहतूक करणारा कंत्राटदार राजू पारसेवार सध्या फरार आहे़ त्यांच्या जामिनावर बुधवारी बिलोली न्यायालयात सुनावणी होणार आहे़ त्यामुळे शासकीय धान्य वितरणव्यवस्थेवर कुठलाही परिणाम झाला नसून कंत्राटदाराच्या प्रतिनिधीमार्फत स्वस्त धान्य दुकानापर्यंत नियमितपणे धान्य पाठविण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली़

टॅग्स :Nandedनांदेडfoodअन्नfraudधोकेबाजीNanded policeनांदेड पोलीस