शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडचे रस्ते अंधारात; महावितरणच्या थकबाकी मोहिमेचा शहराला झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 18:32 IST

नांदेड शहरातील पथदिव्यांना बसल्याने अख्खे शहर काळोखात बुडाले आहे. पाच कोटी 94 लाख रूपयांच्या थकबाकीपोटी महावितरणने ही कारवाई केली आहे.

नांदेड :  नांदेड शहरातील पथदिव्यांना बसल्याने अख्खे शहर काळोखात बुडाले आहे. पाच कोटी 94 लाख रूपयांच्या थकबाकीपोटी महावितरणने ही कारवाई केली आहे.

नांदेड महापालिकेच्या 681 कनेक्शनद्वारे पथदिव्यांना महावितरणच्या वतीने वीजपुरवठा केला जातो. या 681 कनेक्शनची जानेवारी 2018 अखेर एकूण पाच कोटी 94 लाख रुपयांची थकबाकी जमा आहे. या थकबाकी मध्ये जवळपास एक कोटी 44 लाख रुपयांच्या व्याजाचाच समावेश आहे. महानगरपालिका चालू देयक भरत असली तरी वाढती थकबाकी लक्षात घेता महावितरणने वीज पुरवठा खंडित करणेच पसंत केले आहे. मार्च अखेर थकबाकीपैकी किमान एक कोटी दोन लाख रुपये तरी महापालिकेने भरणे अपेक्षित आहे, त्याशिवाय पथदिव्यांचा वीजपुरवठा सुरू केला जाणार नाही अशी भूमिका महावितरण घेतली आहे.

महावितरणच्या नांदेड विभागांतर्गत येणाऱ्या क्रमांक एक उपविभागामध्ये 251 कनेक्शन असून त्यांच्याकडे दोन कोटी 53 लाख रुपयांची थकबाकी आहे तर उपविभाग क्रमांक दोन मध्ये 338 कनेक्शन असून दोन कोटी 55 लाख रुपयांची थकबाकी त्यांच्याकडे आहे. तसेच एमआयडीसी उपविभागामध्ये 92 पथदिव्यांचे कनेक्शन असून त्यांच्याकडे आठ कोटी सहा लाख रुपयांची थकबाकी आहे. महावितरणला मार्च अखेरचे लक्ष पूर्ण करण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या पथदिव्यांची थकबाकी वसूल होणे गरजेचे आहे. त्यामुळे पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्या शिवाय महावितरण पुढे कोणताही पर्याय उरलेला नाही.

पथदिव्यांच्या थकबाकीपोटी नायगाव पालिकेने भरले 11 लाख रूपयेनायगाव नगर पालिकेकडे असलेल्या दोन कोटीच्या थकबाकी पोटी वीजपुरवठा खंडीत करताच पालिका प्रशासनाच्यावतीने आज रोजी 11 लाख रूपयांचा धनादेश महावितरणच्या सुपूर्द केला. 13 कनेकशन द्वारे पथदिव्यांना वीजपुरवठा केला जातो. यापुर्वी मागील तीन महिन्यात 20 लाख रूपयांचा भरणा पालिकेच्या वतीने करण्यात आला आहे. मात्र थकबाकी शिवाय यावर्षीची मागणी 30 लाख रूपयांची असल्याने महावितरणसमोर वसुलीचे मोठे आव्हान उभे आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणNandedनांदेड