शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

नांदेडमध्ये आघाडीपर्वाला पुन्हा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 00:38 IST

नांदेड : मागील काही दिवसांपासून दोन्ही काँग्रेसनी एकत्र येण्याची आवश्यकता राज्यभरातील कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत़ याची प्रत्यक्ष सुरुवात शनिवारी जिल्हा बँक निवडणुकीच्या माध्यमातून नांदेडमध्ये झाली़ दोन्ही काँग्रेस अनपेक्षितरीत्या एकत्रित आल्याने भाजपाला जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदापासून दूर व्हावे लागले़ जिल्ह्यातील यापुढील सर्व निवडणुकाही दोन्ही काँग्रेसने आता एकत्रित लढण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे़

ठळक मुद्देजिल्हा बँक निवडणुकीत भाजपाला धक्का : यापुढील सर्व निवडणुका काँगे्रस-राष्ट्रवादी एकत्र लढणार

विशाल सोनटक्के।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : मागील काही दिवसांपासून दोन्ही काँग्रेसनी एकत्र येण्याची आवश्यकता राज्यभरातील कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत़ याची प्रत्यक्ष सुरुवात शनिवारी जिल्हा बँक निवडणुकीच्या माध्यमातून नांदेडमध्ये झाली़ दोन्ही काँग्रेस अनपेक्षितरीत्या एकत्रित आल्याने भाजपाला जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदापासून दूर व्हावे लागले़ जिल्ह्यातील यापुढील सर्व निवडणुकाही दोन्ही काँग्रेसने आता एकत्रित लढण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे़महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने एकतर्फी विजय मिळवित सेना-भाजपाला धोबीपछाड दिली़ तेव्हापासूनच जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावलेले आहे़ या निवडणुकीपाठोपाठ किनवट नगरपालिकेची निवडणूक पार पडली़ किनवट पालिकेवर दोन्ही काँग्रेसची सत्ता होती़ सदर निवडणुकही दोन्ही पक्षांनी एकत्रित येऊन लढवावी असा पक्षश्रेष्ठींचा विचार होता़ या अनुषंगाने राष्ट्रवादीने नगराध्यक्षासह नऊ तर काँग्रेसने उर्वरीत नऊ जागा लढवाव्यात असा प्रस्ताव होता़ याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा़अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे आ़ प्रदीप नाईक यांच्यात प्राथमिक चर्चाही झाली होती़ मात्र स्थानिक कार्यकर्त्यांचा आग्रह स्वबळ आजमाविण्याचा होता़ पर्यायाने किनवट पालिकेत दोन्ही काँग्रेस आमनेसामने उभे राहिले. निवडणुकीत दोन्ही काँग्रेसमधील मतविभाजनाचा नेमका फायदा भाजपाने उचलला़ आणि नगराध्यक्षासह नऊ जागा जिंकत किनवट पालिकेवर भाजपचा झेंडा फडकला़ भाजपाच्या या विजयामुळे किनवट पालिकेतून राष्ट्रवादीला सत्तेबाहेर जावे लागले़ काँग्रेसचे हातही तेथे रिकामेच राहिले़ किनवटमधील या पराभवानेच शनिवारी झालेल्या जिल्हा बँक निवडणुकीतील आघाडीची बीजे रोवली गेली़नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची २०१५ मध्ये २१ जागांसाठी निवडणूक झाली होती़ त्यात राष्ट्रवादीचे सर्वाधिक ८, भाजपा ७, काँग्रेस ५ तर शिवसेनेचा १ संचालक निवडून आला होता़ मात्र त्यावेळी राष्ट्रवादीने भाजप-सेनेला सोबत घेत जिल्हा बँकेतून काँग्रेसला बाजूला सारले़ त्यामुळे मागील दोन वर्षांपासून जिल्हा बँकेत राष्ट्रवादी-भाजपा-सेना अशी युती होती़ या युतीच्या फॉर्म्युल्यानुसार प्रत्येक पक्षाला एक-एक वर्ष अध्यक्षपद देण्याचा निर्णय झाला होता़ त्यानुसार पहिल्या वर्षी राष्ट्रवादीचे बापूसाहेब गोरठेकर तर दुसºया वर्षी शिवसेनेचे आ़ प्रताप पाटील चिखलीकर जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले़ चिखलीकर यांचा एक वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर शनिवारी पुन्हा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली़ महाआघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार यावेळी अध्यक्षपद भाजपाकडे जाणार होते़ भाजपामध्ये गंगाधर राठोड, लक्ष्मण ठक्करवाड यांच्यासह दिलीप कंदकुर्ते यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत होती़ मात्र शनिवारी जिल्हा बँक अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीला अचानक कलाटणी मिळाली़ दोन्ही काँग्रेसनी एकत्रित येत अध्यक्षपदाचा दावा असलेल्या भाजपाला सत्तेतून बेदखल केले़ अध्यक्षपदाचे भाजपाचे उमेदवार लक्ष्मण ठक्करवाड यांना १० तर राष्ट्रवादीचे दिनकर दहीफळे यांना ११ मध्ये मिळाली़ आता पुढील बैठकीत जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षाची निवड होणार असून या पदावर काँग्रेस संचालकाची वर्णी लागणार हे स्पष्ट झाले आहे़ जिल्ह्यातील यापुढील सर्व निवडणुकाही दोन्ही काँग्रेस आता एकत्र लढणार आहेत.अधिवेशनातच शिजली आघाडीची खिचडीकिनवट नगरपालिका निवडणुकीत मतविभाजनाचा फायदा भाजपाला मिळाला़ त्यामुळे दोन्ही काँग्रेसला किनवटमध्ये सत्तेबाहेर जावे लागले होते़ दोन्ही काँग्रेस एकत्रित आली तर नांदेड जिल्ह्यात भाजपाला फार वाव राहणार नाही, असा मतप्रवाह तेव्हापासूनच सुरु होता़किनवट निवडणुकीतूनच धडा घेऊन दोन्ही काँग्रसने जिल्हा बँकेत एकत्र येण्याचे ठरविले़ नागपूर अधिवेशनात या अनुषंगाने काँग्रेसचे आ़ अमरनाथ राजूरकर, राष्ट्रवादीचे आ़ प्रदीप नाईक, आ़ सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे यांनी यासाठी पुढाकार घेतला. या आमदारांनी आपआपल्या पक्षश्रेष्ठींशी सल्लामसलत केल्यानंतर जिल्हा बँकेत एकत्रित येण्याच्या हालचाली सुरु झाल्या.यात धनंजय मुंडे यांची भूमिकाही महत्त्वाची राहिलीअशोक चव्हाण, अजित पवारयांच्यातील बोलणी ठरली निर्णायकनागपूर अधिवेशनात आमदारांनी दोन्ही काँग्रेसनी एकत्रित येण्याचा आग्रह धरल्यानंतर गुरुवारी सायंकाळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा़ अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यात दूरध्वनीवर निर्णायक चर्चा झाली. त्यानंतर जिल्हा बँकेत एकत्रित येण्याचे निश्चित करण्यात आले़ त्यानंतर लगेच अजित पवार यांनी भ्रमणध्वनीवरुन नांदेड जिल्हा बँकेतील राष्ट्रवादीच्या आठही संचालकांशी संवाद साधत जिल्हा बँकेत काँग्रेससोबत एकत्रित येत असल्याची माहिती देत त्यानुसार मतदान करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शनिवारी दोन्ही काँग्रेसनी एकत्रित येत भाजपाला धोबीपछाड दिली़ खा. अशोक चव्हाण आणि राष्टÑवादीचे अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनुसार पुढीलवर्षीही अध्यक्षपद राष्टÑवादीकडे राहणार असून उपाध्यक्षपद काँग्रेसला मिळणार असल्याचे समजते.