शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड बलात्कार प्रकरणात मौलानाला सहा दिवसांची पोलिस कोठडी; माजलगांवच्या तिघांची कारागृहात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 18:34 IST

शहरातील चुनाभट्टी भागात असलेल्या मदरशामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात मौलाना साबेर फारुखी याला गुरुवारी औरंगाबाद येथून अटक करण्यात आली होती़ शुक्रवारी सायंकाळी मौलानाला न्यायालयात हजर करण्यात आले होते़ यावेळी न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली़ तर माजलगांव येथील तिघांची कारागृहात रवानगी करण्यात आली़ 

नांदेड : शहरातील चुनाभट्टी भागात असलेल्या मदरशामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात मौलाना साबेर फारुखी याला गुरुवारी औरंगाबाद येथून अटक करण्यात आली होती़ शुक्रवारी सायंकाळी मौलानाला न्यायालयात हजर करण्यात आले होते़ यावेळी न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली़ तर माजलगांव येथील तिघांची कारागृहात रवानगी करण्यात आली़ 

चुनाभट्टी भागात शिक्षण घेणार्‍या माजलगांव येथील अल्पवयीन मुलीला मोबाईलवर अश्लील चित्रफित दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी मौलाना साबेर फारुखीवर इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता़ या प्रकरणात पिडीत मुलीच्या आईने तक्रार दिली होती़ त्यानंतर पोलिसांनी मौलानाला सहकार्य करणार्‍या माजलगांव येथील तिघांना उचलले होते़ याच दरम्यान, मौलानाच्या विरोधात विनयभंगाचे आणखी दोन गुन्हे दाखल झाले़ गुन्हा दाखल झाल्यापासून मौलाना फरारच होता़ त्याच्या तपासासाठी चार पथके नियुक्त करण्यात आली होती़ तर दुसरीकडे माजलगांव येथील नवाब पटेल, इद्रीस पाशा आणि खलील गणी पटेल या तिघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती़ 

गुरुवारी नांदेड पोलिसांनी मौलानाला औरंगाबाद येथून अटक केली होती़ शुक्रवारी सुरुवातीला माजलगांव येथील तिघांची न्यायालयाने कारागृहात रवानगी केली़ त्यानंतर सायंकाळी साडे चार वाजेच्या सुमारास मौलानाला न्यायालयात हजर करण्यात आले़ यावेळी परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता़ न्या़एस़आऱजगताप यांच्यापुढे मौलानाला हजर करण्यात आले़ यावेळी न्या़जगताप यांनी मौलानाला २५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले़ 

न्यायाधीशांपुढे मौलाना निरुत्तरन्या़एस़आऱजगताप यांच्यापुढे मौलाना साबेर फारुखी याला हजर करण्यात आले़ यावेळी न्या़जगताप यांनी मौलानाला तुम्हाला काही बोलायच आहे का? असा प्रश्न केला़ परंतु मौलानाच्या तोंडून शब्द फुटत नव्हते़ न्यायाधीशांनी पुन्हा तोच प्रश्न विचारला़ त्यावर मौलानाला मुझे फसाया गया है? असे उत्तर दिले़ त्यावर न्या़जगताप यांनी पुन्हा किसने फसाया? असा प्रश्न केला़ या प्रश्नावर मात्र मौलाना निरुत्तर झाला़ तुमचा कोणी वकील आहे का? या प्रश्नावर मौलानाने माझ्याकडून कोणीच नसल्याचे सांगितले़ विशेष म्हणजे मौलानाचे वकीलपत्र घेण्यासाठी कुणीही पुढे न आल्यामुळे न्यायालयानेच मौलानाला वकील दिला़

मौलानावर फेकली चप्पलमौलानाला न्यायालयात आणण्यात येणार असल्याची माहिती होताच न्यायालय परिसरात मोठी गर्दी जमली होती़ त्यामुळे पोलिसांनी मौलानाला मागील प्रवेशद्वारातून न्यायालयात आणले़ यावेळी मोठा फौजफाटा परिसरात तैनात करण्यात आला होता़ मौलानाला पोलिस कोठडीत घेवून जात असताना, जमावातील एकाने मौलानावर चप्पल भिरकाविली़ प्रसंगावधान राखून पोलिसांनी तातडीने मौलानाला घेवून पोलिस वाहन गाठले.