शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
3
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
4
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
5
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
6
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
7
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
8
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
9
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
10
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
11
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले १३ हजार अश्लील फोटो, मुंबई पोलिसांनाही बसला धक्का
12
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
13
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
14
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
15
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
16
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
17
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
18
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
19
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
20
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या

नांदेड पोलिसांची कारवाई महसूलच्या जिव्हारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:45 IST

गोदावरी नदी जिल्ह्यासाठी जीवनदायिनी आहे़ मात्र अमाप वाळू उपसा करुन नदीपात्राची सध्या अपरिमित हानी करण्यात येत आहे़ त्यामुळे पर्यावरणाचा -हास होत असून पाणीटंचाईची भीषण समस्याही दरवर्षी निर्माण होत आहे़ केवळ ३१ कोटींच्या महसुलापोटी प्रशासनाला ३८ घाटांचे नखरे सहन करावे लागत आहेत़ परंतु या अमर्याद वाळू उपशामुळे दरवर्षी पाणीटंचाई आराखड्यावर त्यापेक्षा दुप्पट रक्कम खर्ची पडत आहे़ विशेष म्हणजे, अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी नावालाच दोन पथके नियुक्त करण्यात आली आहेत़

ठळक मुद्देवाळूचा बेसुमार उपसा : कारवाईसाठी मात्र केवळ दोन पथकांची स्थापना

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : गोदावरी नदी जिल्ह्यासाठी जीवनदायिनी आहे़ मात्र अमाप वाळू उपसा करुन नदीपात्राची सध्या अपरिमित हानी करण्यात येत आहे़ त्यामुळे पर्यावरणाचा -हास होत असून पाणीटंचाईची भीषण समस्याही दरवर्षी निर्माण होत आहे़ केवळ ३१ कोटींच्या महसुलापोटी प्रशासनाला ३८ घाटांचे नखरे सहन करावे लागत आहेत़ परंतु या अमर्याद वाळू उपशामुळे दरवर्षी पाणीटंचाई आराखड्यावर त्यापेक्षा दुप्पट रक्कम खर्ची पडत आहे़ विशेष म्हणजे, अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी नावालाच दोन पथके नियुक्त करण्यात आली आहेत़काही हजार ब्रास वाळू काढण्याचा ठेका घेवून सर्रासपणे लाखो ब्रास वाळू उपसा करुन नदीपात्रांची अक्षरश: लूट करण्यात येत आहे़ महसूल विभागाच्या आशीर्वादाशिवाय हा प्रकार होणे अशक्यच आहे़ यंदा राज्यात अनेक ठिकाणी रेती उपशाला परवानगी मिळाली नाही़ त्यामुळे वाळू माफियांचे सर्व लक्ष नांदेड जिल्ह्याकडे केंद्रित झाले़ वाळूला सोन्यासारखा भाव आला़त्यामुळे राजकीय पुढाऱ्यांच्या टोळ्याही नदीपात्रात उतरल्या़ तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी अशा अधिकाºयांची मोठी फौज असताना, पोलिसांना या घाटांवर कारवाई करावी लागत आहे यातच सर्व आले़ सहाय्यक पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी दोन वाळू घाटांवर धाड मारत ९ जेसीबी, २२ ट्रक आणि १० हजार ब्रास वाळू जप्त केली़ त्यानंतर सोमवारी नायगाव तालुक्यातील सातेगाव येथे १० जेसीबी, २७ ट्रक, १ लाख ब्रास वाळू जप्त केली़ त्यांच्या या कारवाईने वाळू माफीयांचे कंबरडे मोडले असताना महसूल प्रशासन मात्र अद्यापही जागचे हलण्यास तयार नाही़ नुरुल हसन यांच्या कारवाई विरोधात वाळू ठेकेदार मात्र एक झाले़ त्यांनी जिल्हाधिकाºयांकडेही धाव घेतली़ परंतु त्यानंतर नुरुल हसन यांनी वाळू माफियांच्या विरोधात मोहीम तीव्र करण्याचा इशारा दिला़ त्यामुळे वाळू माफियांच्या विरोधात सुरु असलेली पोलिसांची कारवाई महसूलच्या मात्र जिव्हारी लागली आहे़वाळू उपसा रोखण्यासाठी पथके४याबाबत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे म्हणाले, अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी जिल्ह्यात दोन पथकांची स्थापना करण्यात आली आहे़ या पथकाद्वारे अशा प्रकारचा वाळू उपसा रोखण्यासाठी कारवाई केली जात आहे़ आवश्यक त्या ठिकाणी पोलिसांचीही मदत घेतली जात आहे़

टॅग्स :Nanded policeनांदेड पोलीसgodavariगोदावरी