शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड येथील खून प्रकरणात दोघे दोषी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 01:21 IST

नांदेड : किरकोळ कारणावरुन चंदासिंग कॉर्नर परिसरात २०१३ मध्ये चाकूने भोसकून तरुणाचा खून केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने दोघांना दोषी ठरविले आहे़ या प्रकरणात गुरुवारी न्यायालय शिक्षा सुनावणार आहे़

ठळक मुद्देचंदासिंग कॉर्नर परिसरात झाला होता युवकाचा खून

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : किरकोळ कारणावरुन चंदासिंग कॉर्नर परिसरात २०१३ मध्ये चाकूने भोसकून तरुणाचा खून केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने दोघांना दोषी ठरविले आहे़ या प्रकरणात गुरुवारी न्यायालय शिक्षा सुनावणार आहे़मोहम्मद आवेज ऊर्फ चिंग्या रा़बळीरामपूर व बालाजी यादव हे दोघे जण २७ डिसेंबर २०१३ रोजी चंदासिंग कॉर्नर परिसरात पद्मावती बारमध्ये बसले होते़ रात्री सात वाजेच्या सुमारास हे दोघेही जण बारच्या बाहेर पडले़ त्यानंतर मोहम्मद आवेज हा लघूशंकेसाठी बसस्टँडमधील गल्लीत गेला़ तर बालाजी यादव हा रस्त्याच्या कडेला उभा होता़ यावेळी सुनील ऊर्फ सुन्या गंगाधर कोकाटे, विजय मधुकर ढगे, प्रभाकर नामदेव येडे, सत्यम व्यंकटराव हत्ते व सुनील भगवानराव सूर्यवंशी हे पाच जण त्या ठिकाणी आले़ यावेळी सुनील कोकाटे याने मोहम्मद आवेज याच्याशी वाद घातला़ त्यानंतर मोहम्मद आवेज याला खाली पाडून त्याच्या छातीवर बसून वार केले़ त्यानंतर सत्यम हत्ते यानेही आवेज याच्या छातीवर बसून चाकूने वार केले़घटनास्थळीच मोहम्मद आवेज याचा मृत्यू झाला़ हा सर्व प्रकार बालाजी यादव हा समोरुन पाहत होता़ यावेळी यादवने घटनास्थळावरुन पळ काढून नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे गाठले़ या प्रकरणात बालाजी यादव याच्या तक्रारीवरुन पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला़ होता़ तत्कालीन पोनि़ श्रीधर पवार यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़सरकार पक्षाच्या वतीने एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले़ यामध्ये बालाजी यादव याची साक्ष महत्वाची ठरली़या प्रकरणात आरोपी सुनील ऊर्फ सुन्या गंगाधर कोकाटे व सत्यम व्यंकटराव हत्ते या दोघांना पाचवे जिल्हा न्या़एच़आऱ वाघमारे यांनी दोषी ठरविले आहे़ तर उर्वरित तिघांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे़ दोषींना गुरुवारी शिक्षा सुनावण्यात येणार आहे़ सरकार पक्षाच्या वतीने मुख्य सरकारी वकील अ‍ॅड़अमरिकसिंघ वासरीकर यांनी बाजू मांडली़