शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड महापालिकेच्या अर्थसंकल्पास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 00:54 IST

महापालिकेचा स्थायी समितीने सादर केलेल्या ७८६ कोटींच्या अर्थसंकल्पास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. या अर्थसंकल्पात बदल करण्याचे सर्व अधिकार महापौर शीलाताई भवरे यांना सोमवारी झालेल्या अर्थसंकल्पीय बैठकीत सभागृहाने प्रदान केले. त्यामुळे या अर्थसंकल्पात नेमकी कितीची वाढ होईल, हे येत्या काही दिवसांतच कळणार आहे.

ठळक मुद्देकोणतीही करवाढ नाही : उत्पन्नवाढीच्या विषयावर सदस्यांनी केली चर्चा, स्वेच्छा निधीमध्ये वाढ करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महापालिकेचा स्थायी समितीने सादर केलेल्या ७८६ कोटींच्या अर्थसंकल्पास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. या अर्थसंकल्पात बदल करण्याचे सर्व अधिकार महापौर शीलाताई भवरे यांना सोमवारी झालेल्या अर्थसंकल्पीय बैठकीत सभागृहाने प्रदान केले. त्यामुळे या अर्थसंकल्पात नेमकी कितीची वाढ होईल, हे येत्या काही दिवसांतच कळणार आहे.महापौर शीलाताई भवरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी शहरातील डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात अर्थसंकल्पीय सभा घेण्यात आली. या सभेत स्थायी समितीने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पाला सर्वसाधारण सभेनेही मंजुरी दिली. त्याचवेळी अर्थसंकल्पात वाढीव तरतूद करण्याचे अधिकारही सभागृहाने महापौरांना प्रदान केले.महापालिका प्रशासनाने सादर केलेल्या ७८० कोटींच्या अर्थसंकल्पात स्थायी समितीने ६ कोटी ६५ लाखांची वाढ सुचवत ३१ मार्च रोजी मंजुरी दिली होती. त्यानंतर अर्थसंकल्प ४ एप्रिल रोजी झालेल्या सभेत सर्वसाधारण सभेत महापौर शीलाताई भवरे यांना सुपूर्द केला होता. अभ्यासानंतर १० एप्रिल रोजी झालेल्या सभेत मंजुरी देण्यात आली.अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभाग घेताना सभागृहनेते गाडीवाले यांनी महापालिका प्रशासनाने मागील वर्षभरात केलेल्या विविध विकास कामांचा उल्लेख केला. या कामातून शहर प्रगतीकडे जात आहे. त्यामध्ये आयुक्त गणेश देशमुख यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. अजूनही उत्पन्नवाढीच्या विषयात वाव असल्याचे ते म्हणाले. नगररचना विभागाला सक्षम करताना महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल, असेही ते म्हणाले.माजी महापौर अब्दुल सत्तार यांनीही उत्पन्न वाढीसाठी महापालिकेला प्रयत्न करण्याचे गरज असल्याचे सांगितले. बीओटी तत्त्वावर महापालिकेने व्यापारी संकुलाचा विकास केल्यास उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले.फारुख अलीखान, दीपक रावत, आनंद चव्हाण, सतीश देशमुख यांनीही चर्चेत सहभाग घेतला. तरोडा भागातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी देशमुख यांनी केली तर रावत यांनी आस्थापनेवरील वाढत्या खर्चावर बोट ठेवले.नगरसेवकांना स्वेच्छा निधी अंतर्गत प्रत्येकी १० लाख रुपये देण्याची तरतूद स्थायी समितीने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पात ठेवण्यात आली आहे. यामध्ये वाढ करावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली. मात्र आयुक्त देशमुख यांनी महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता ही वाढ करता येणार नसल्याचे सांगितले.दहा लाखांच्या स्वेच्छा निधीस सभागृहाची मंजुरी असेल तर एप्रिलमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये रक्कम देण्यात येईल आणि दुसरा टप्पा सप्टेंबरमध्ये वितरित केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. स्वेच्छा निधीसाठी जवळपास ९ ते १० कोटी रुपये अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी उपमहापौर विनय गिरडे, स्थायी समिती सभापती शमीम अब्दुल्ला, उपायुक्त रत्नाकर वाघमारे, संभाजी वाघमारे, नगरसचिव अजितपालसिंघ संधू आदींची उपस्थिती होती.श्री गुरूगोविंदसिंघजी जयंतीसाठी केवळ एक हजार !सोमवारी सर्वसाधारण सभेपुढे सादर झालेल्या अर्थसंकल्पात सामाजिक सेवा सुविधांअंतर्गत विविध कार्यक्रमांसाठी ३७ लाख ६१ हजार रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये श्री गुरूगोविंदसिंघजी जयंती सोहळा कार्यक्रमासाठी केवळ एक हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती. ही बाब नगरसेविका गुरुप्रीतकौर सोडी यांनी निदर्शनास आणून देताना श्री गुरूगोविंदसिंघांची नगरी म्हणून नांदेडची ओळख आहे. हजारो कोटी रुपये श्री गुरुगोविंदसिंघांच्या नावाने निधी येत आहे. असे असताना महापालिकेने श्री गुरुगोविंदसिंघजी जयंतीसाठी केवळ एक हजार रुपयांची तरतूद करणे ही बाब निषेधार्ह असल्याचे सांगितले. स्थायी समिती सभापतींचा त्यांनी निषेध केला. शेवटी सभागृहाने या कार्यक्रमासाठी निधीची तरतूद वाढवून द्यावे, असा निर्णय घेतला.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाBudgetअर्थसंकल्पNandedनांदेडcommissionerआयुक्त