शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडचे महापौर, उपमहापौर होणार आज पायउतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 00:37 IST

एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता ताणलेली असतानाच नांदेड महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरांना काँग्रेसश्रेष्ठींनी राजीनाम्याचे आदेश दिले

ठळक मुद्देमहापालिका : पाणीटंचाईच्या विशेष सर्वसाधारण सभेत राजीनामा देण्याचे पक्षश्रेष्ठींचे आदेश

नांदेड : एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता ताणलेली असतानाच नांदेड महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरांना काँग्रेसश्रेष्ठींनी राजीनाम्याचे आदेश दिले असून बुधवारी होणाऱ्या पाणीटंचाई संदर्भातील विशेष बैठकीत महापौर शीलाताई भवरे आणि उपमहापौर विनय गिरडे हे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द करणार आहेत.नांदेड महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या शीलाताई किशोर भवरे आणि उपमहापौरपदी विनय गिरडे यांची १ नोव्हेंबर २०१७ रोजी बहुमताने निवड झाली होती. महापालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. ८१ पैकी ७४ नगरसेवक काँग्रेसचे आहेत. महापौरपदाचा कालावधी हा संवैधानिकदृष्ट्या अडीच वर्षांचा असला तरीही काँग्रेसने नांदेडमध्ये महापौरपदाचा कालावधी सव्वा वर्षाचा निश्चित केला होता. त्यानंतर दुसऱ्यांना संधी देण्याचे धोरण त्यामागे होते. त्यानुसार महापौर शीला भवरे यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाळ उलटला आहे. लोकसभा निवडणुकीमुळे जवळपास दोन महिने जादा कार्यकाळ भवरे यांना उपभोगता आला आहे.नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी १८ एप्रिल रोजी झालेल्या मतदानानंतर महापौर बदलाच्या चर्चेला सुरुवात झाली होती. मात्र, आचारसंहितेचा कालावधी लक्षात घेता हा बदल पुढे ढकलला. महापालिकेची विशेष सभा २२ मे रोजी बोलावण्यात आली आहे. या सभेत महापौर आणि उपमहापौरांना राजीनामा देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही पदाधिका-यांचा कार्यकाळ आता संपुष्टात येणार आहे.अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी नांदेड महापालिकेचे महापौरपद राखीव आहे. उर्वरीत १३ महिन्यांच्या कालावधीसाठी काँग्रेसच्या ज्योती सुभाष रायबोले, दिशा कपिल धबाले, ज्योती कदम, पूजा पवळे या महापौरपदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. पण त्याचवेळी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार तथा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना कोणत्या प्रभागातून जादा मतदान होईल त्याच मतदानाच्या आधारावर नवा महापौर निवडला जाईल, असेही सांगितले जात आहे.नांदेड महापालिकेच्या महापौरपदी पहिल्यांदाच अनुसूचित जाती प्रवर्गातून महिलेला मान मिळाला होता. काँग्रेसने शीला भवरे यांची निवड केली होती. तर उपमहापौरपदाचा मान विनय गिरडे यांना दिला होता.दरम्यान, नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे बी. आर. कदम यांचाही काँग्रेसने ७ मे रोजी तीन वर्षांचा कार्यकाळ संपल्याने राजीनामा घेतला आहे. पक्षातील सर्वांना न्याय मिळावा या हेतूने काँग्रेसने पदाधिकाºयांचा कालावधी निश्चित केला आहे. त्या धोरणानुसारच राजीनामे घेतले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नव्या महापौर, उपमहापौर निवडीची प्रक्रिया सुरू होणार आहे. निकालानंतर जवळपास १५ ते २० दिवसांत नव्या महापौर-उपमहापौरांची निवड होईल, हेही स्पष्ट करण्यात आले आहे.पाणीटंचाईवर होणार चर्चाशहरात विशेषत: दक्षिण नांदेडात झालेल्या पाणीटंचाईवर चर्चा केली जाणार आहे. पाणीटंचाई निवारणासाठी होणा-या विशेष सर्वसाधारण सभेत शहरातील अनेक भागात वेळी-अवेळी होणारा पाणीपुरवठा प्रशासनासाठी डोकेदुखी ठरणार आहे. त्याचवेळी पाण्याचा अपव्यय होत असल्याचे चित्र अनेक भागात आहे.पाणीटंचाई निवारणासाठी महापालिकेने केलेल्या उपाययोजनांची माहिती सदस्य उपस्थित करतील. विष्णूपुरीतील पाणी संपल्यानंतर पर्यायी व्यवस्था काय? हा प्रश्नही कळीचा ठरणार आहे. जून अखेरपर्यंत शहराला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन काय? टँकरने पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था आदीबाबत चर्चा अपेक्षित आहे.

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाMayorमहापौरResignationराजीनामा