शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड मनपात एकमेव अपक्षाचा विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 00:37 IST

महापालिकेत सुरू असलेल्या विरोधी पक्ष नेतेपदाचे त्रांगडे कायम असताना महापौर शीलाताई भवरे यांनी या पदासाठी अपक्ष नगरसेवक संदीपसिंघ गाडीवाले यांनीही दावा केल्याची माहिती दिली आहे़ त्यामुळे या सर्व प्रकरणात आता विभागीय आयुक्तांकडे मार्गदर्शन मागवले असल्याचे महापौरांनी सांगितले़ महापालिकेत एकमेव अपक्ष नगरसेवकाने विरोधी पक्ष नेतेपदासाठी दावा करणे ही बाबही आता नव्या राजकारणाला आमंत्रण देत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महापालिकेत सुरू असलेल्या विरोधी पक्ष नेतेपदाचे त्रांगडे कायम असताना महापौर शीलाताई भवरे यांनी या पदासाठी अपक्ष नगरसेवक संदीपसिंघ गाडीवाले यांनीही दावा केल्याची माहिती दिली आहे़ त्यामुळे या सर्व प्रकरणात आता विभागीय आयुक्तांकडे मार्गदर्शन मागवले असल्याचे महापौरांनी सांगितले़ महापालिकेत एकमेव अपक्ष नगरसेवकाने विरोधी पक्ष नेतेपदासाठी दावा करणे ही बाबही आता नव्या राजकारणाला आमंत्रण देत आहे़भाजपाच्या नगरसेविका गुरप्रीतकौर सोडी यांना विरोधी पक्षनेते पद द्यावे याबाबत भाजपा शहराध्यक्षांनी महापौरांना पत्र दिले़ मात्र विरोधी पक्षनेतेपद देण्यास होत असलेल्या विलंबामुळे आपण विरोधी पक्ष नेता कक्षाचा ताबा घेऊ असे पत्र सोडी यांनी १७ फेब्रुवारी रोजी महापौरांना दिले़या अनुषंगाने विरोधी पक्ष नेतापदास मान्यता नसल्याने नगरसचिव विभागाने मनपातील विरोधी पक्षनेता कक्षास सील ठोकले़ दुसरीकडे सभागृहनेता पदास मान्यता नसताना सभागृह नेता कक्ष कसा उघडा ठेवला गेला याबाबत आक्षेप घेत नगरसेविका गुरप्रीतकौर सोडी यांनी कारवाईची मागणी केली़त्यामुळे महापालिका प्रशासनाने सभागृह नेता कक्षलाही सील ठोकले़ त्यानंतर दुसºयाच दिवशी गुरूवारी काँग्रेसने महापालिकेच्या सभागृह नेतेपदी विरेंद्रसिंघ गाडीवाले यांची फेरनिवड केली़ या निवडीनंतर सभागृह नेता कक्ष उघडण्यात आला़सभागृह नेते पदाचा विषय संपुष्टात आला असताना विरोधी पक्ष नेतेपदाचे त्रांगडे मात्र आणखी किचकट झाले आहे़ महापालिकेतील एकमेव अपक्ष नगरसेवक असलेल्या संदीपसिंघ गाडीवाले यांनी आपल्यासोबत काही नगरसेवक असून आपल्याला विरोधी पक्षनेतेपद द्यावे अशी मागणी महापौर शीलाताई भवरे यांच्याकडे केली आहे़ त्यामुळे संदीपसिंघ गाडीवाले यांच्या समवेत कोणते नगरसेवक आहेत, हा संशोधनाचा विषय आहे़ ते भाजपाचे आहेत की काँग्रेसचे याबाबतही आता चर्चा सुरू झाली आहे़संदीपसिंघ गाडीवाले यांनी आपल्यासोबत कोणते नगरसेवक आहेत हे स्पष्टपणे सांगितले नसतानाही ही बाब महापौरांनी कशाच्या आधारे मान्य केली, वेगळ्या गटाची नोंदणी विभागीय आयुक्तांकडे झाली आहे का, विरोधी पक्ष नेतेपदासाठी एका अपक्ष नगरसेवकाने दावा करणे व महापौरांनी त्याला मान्य करणे या सर्व घडामोडी आता नव्याच राजकारणाकडे जाणाºया आहेत़विशेष म्हणजे एकमेव अपक्षाने केलेल्या विरोधी पक्षनेतेपदाच्या दाव्याबाबत महापौरांनी विभागीय आयुक्तांकडे मार्गदर्शन मागविले आहे़ मार्गदर्शन येताच विरोधी पक्षनेते पदाबाबतचा निर्णय घेतला जाईल असेही महापौर भवरे यांनी स्पष्ट केले आहे.