शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यात आधार लिंक असणाऱ्यांनाच धान्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 19:03 IST

जिल्ह्यात आॅनलाईन शिधापत्रिकाधारक तसेच आधार सिडींग झालेल्या लाभार्थ्यांनाच स्वस्त धान्य वाटप करावे, या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या निर्णयास नांदेड जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटनेने विरोध दर्शविला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील १६ तालुक्यांत सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत  फेब्रुवारी २०१८ पासून ई-पॉसद्वारे धान्य वाटप करण्यात येत आहे.  या निर्णयास जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेने केंद्र शासनाने दिलेल्या एका निर्णयाआधारे विरोध दर्शविला आहे.

नांदेड : जिल्ह्यात आॅनलाईन शिधापत्रिकाधारक तसेच आधार सिडींग झालेल्या लाभार्थ्यांनाच स्वस्त धान्य वाटप करावे, या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या निर्णयास नांदेड जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटनेने विरोध दर्शविला आहे. आधारकार्डबाबत केंद्र सरकारने नवे आदेश दिले असून त्यामध्ये ३० जून २०१८ पर्यंत आधार नोंदणीवर धान्य वाटपाचा निर्णय ठरवू नये, असे स्पष्ट केले असल्याचेही संघटनेने म्हटले आहे.

जिल्ह्यातील १६ तालुक्यांत सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत  फेब्रुवारी २०१८ पासून ई-पॉसद्वारे धान्य वाटप करण्यात येत आहे. फेब्रुवारीमध्ये २२ तारखेपासून धान्य स्वस्त धान्य दुकानदारांना दिले. वितरणासाठी फक्त आठ दिवस मिळाले. मार्च १८ मध्येही नियतन व वितरणासाठी १० ते १२ दिवस मिळाले आणि एप्रिल २०१८ या महिन्यात हमालाच्या संपामुळे आणि द्वारपोच योजनेचा प्रारंभ २१ एप्रिल रोजी करण्यात आला. प्रत्यक्ष वितरण हे २४ एप्रिलपासून झाले. या महिन्यात केवळ सात दिवस मिळाले. त्यातही दोन दिवस सुट्या आल्या. 

शासनाने एप्रिल २०१८ साठी संपूर्ण राज्यभरात धान्य वितरणासाठी चार दिवस मुदतवाढ दिली. एप्रिलमध्ये १० दिवस वितरणासाठी मिळाले. जिल्ह्यात तालुका, नगरपालिका क्षेत्र तसेच महापालिका क्षेत्रात दहा दिवसांत धान्य वाटप करणे अशक्य बाब आहे. त्यामुळे मे २०१८ चे धान्य नियतन हे ५ तारखेला काढल्यास २५ दिवस वितरणासाठी मिळाले असते. त्यातून धान्य वितरण वेळेत करणे शक्य झाले असते. 

त्यातही वाढत्या तापमानामुळे ई-पॉस मशीन वारंवार बंद पडत आहेत. त्याचाही वितरणावर परिणाम होत आहे. जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेने पुरवठा अधिकाऱ्यांच्या या निर्णयास स्वस्त धान्य संघटनेने विरोध दर्शविला आहे. अन्नधान्याची कोणतीही कपात करु नये, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. केंद्र शासनाने आधार नसले तरीही लाभार्थ्यांना धान्य वाटप करावे, अशा सूचना दिल्याचे सांगण्यात आले.  यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक एडके, उद्धव राजेगोरे, शेषराव पाटील,  मिलिंद खंदारे, रमेश चव्हाण, एम.एन. तडवी, उद्धवसिंग कल्याणकर, महमद मुजाहीद, बळवंत सूर्यवंशी आदी उपस्थित होते. 

स्वस्त धान्य दुकानदारांचा विरोधजिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी ४ मे रोजी पत्र काढून मे २०१८ चे स्वस्त धान्य दुकानदारांचे नियतन आॅनलाईन शिधापत्रिकाधारक तसेच आधार सिडींग लाभार्थीप्रमाणे काढावेत, असे आदेश तहसीलदारांना दिले आहे. आॅनलाईन शिधापत्रिकाद्वारा तसेच आधार सिडींग लाभधारकांना धान्य वाटप करुन उर्वरित धान्य साठा यांचा ताळमेळ घेवून पुढील महिन्याची नियतन काढावे. केवळ पात्र लाभार्थ्यांनाच धान्य वितरण होईल, याची दक्षता घ्यावी. आधार लिंक न झालेल्या लाभार्थ्यांना धान्य वाटप होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत. आधार क्रमांक जमा करुनच संबंधितांना धान्य वितरण करावे, अपात्र लाभार्थ्यांना धान्य वितरण झाल्यास याची जबाबदारी त्या- त्या तहसीलदारांवर राहील, असे स्पष्ट म्हटले आहे.  या निर्णयास जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेने केंद्र शासनाने दिलेल्या एका निर्णयाआधारे विरोध दर्शविला आहे.

टॅग्स :digitalडिजिटलNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेडNandedनांदेड