शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

नांदेड जिल्हा बँकेच्या पाच शाखांना टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 00:02 IST

अनामत रकमा अत्यल्प असणे, व्यवहार कमी असणे या बरोबरच शाखाही तोट्यात चालत असल्याने जिल्हा बँकेने जिल्ह्यातील पाच शाखांना अखेर टाळे ठोकले आहे. या बँकांतील सभासदांना शेजारच्या इतर बँकांशी जोडण्यात आले आहे.

ठळक मुद्देसंचालक मंडळाचा निर्णय: आर्थिक उलाढाल मंदावल्याने कार्यवाही

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : अनामत रकमा अत्यल्प असणे, व्यवहार कमी असणे या बरोबरच शाखाही तोट्यात चालत असल्याने जिल्हा बँकेने जिल्ह्यातील पाच शाखांना अखेर टाळे ठोकले आहे. या बँकांतील सभासदांना शेजारच्या इतर बँकांशी जोडण्यात आले आहे.जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती अलीकडील काही महिन्यांत काहीशी सुधारली असली तरी मागील अनेक वर्षांपासून बँकेची स्थिती नाजूक आहे. त्यामुळेच २९ आॅक्टोबर २०१५ रोजी तत्कालीन संचालक मंडळाने कमी उलाढालीसह तोट्यात असणाऱ्या जिल्ह्यातील १५ शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या शाखा बंद करण्याची कार्यवाही झाली नव्हती. साधारणत: वर्षभराने जिल्हा बँकेने त्यातील ९ शाखा बंद केल्या. त्यानंतर २०१६ मध्ये शेवाळा आणि बारड या २ शाखांचे नजीकच्या जिल्हा बँकेच्या शाखेमध्ये विलीनीकरण करण्यात आले. त्यानंतर ५ शाखा बाबतचा विषय ऐरणीवर होता. मात्र या शाखा बंद केल्यास शेतक-यांना त्रास होईल, जिल्हा बँकेच्या या शाखांमधूनच शासनाच्या विविध योजनांचा निधी दिला जात असल्यानेही शाखा बंद करु नये, अशी संचालक मंडळाची भूमिका होती. मात्र बँकेच्या आर्थिक उलाढालीत दिवसेंदिवस घट होत गेल्याने तोटाही वाढत गेला. पर्यायाने या शाखांची स्थिती सुधारत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ८ जून रोजी जिल्ह्यातील मांजरम, कलंबर, बारुळ, उस्माननगर आणि गणेशनगर (नांदेड) या ५ शाखा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. सदर शाखा बंद केल्याबाबतचे लेखी पत्र जिल्हा अग्रणी बँकेला पाठविण्यात आले असून रिझर्व्ह बँकेलाही याबाबतचा अहवाल पाठविण्यात आला आहे. दरम्यान, बँकेने मोठ्या संस्थांकडील वसुलीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.---शेजारच्या शाखेतून होणार व्यवहारजिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने तोट्यात चालणाºया ५ शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या भागातील सभासदांच्या सोयीसाठी या शाखा परिसरातील सभासदांना नजीकच्या शाखेशी जोडून देण्यात आले आहे. कलंबर शाखेतील सभासद सोनखेडशी, बारुळ शाखेचे चिखलीशी, उस्माननगर शाखेचे शिराढोणशी, मांजरम शाखेचे नायगावशी तर गणेशनगर येथील जिल्हा बँकेच्या शाखेचे जिल्हा बँकेच्या नांदेड येथील जिल्हा परिषद शाखेतून व्यवहार होतील, असे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कदम यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :NandedनांदेडbankबँकBanking Sectorबँकिंग क्षेत्रBank of Indiaबँक ऑफ इंडिया