शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडच्या आयुक्तालयाची नांदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 00:14 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी देणारी ७३ व ७४ व्या घटनादुरूस्तीचा रौप्यमहोत्सव राज्यात उत्साहात होत असताना याच विषयावर नांदेडमध्ये झालेली विभागीय परिषद ही नांदेडच्या प्रशासनाचा आत्मविश्वास वाढविणारी ठरली आहे़ दुसरीकडे या परिषदेमुळे नांदेडकरांनाही विभागीय दर्जाचा फील अनुभवता आला. एकप्रकारे ही परिषद नांदेडच्या विभागीय आयुक्तालयाची नांदी असल्याचे म्हटले जात आहे.

ठळक मुद्देघटनादुरुस्ती रौप्य महोत्सवनांदेडकरांना मिळाला विभागीय दर्जाचा फील

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी देणारी ७३ व ७४ व्या घटनादुरूस्तीचा रौप्यमहोत्सव राज्यात उत्साहात होत असताना याच विषयावर नांदेडमध्ये झालेली विभागीय परिषद ही नांदेडच्या प्रशासनाचा आत्मविश्वास वाढविणारी ठरली आहे़ दुसरीकडे या परिषदेमुळे नांदेडकरांनाही विभागीय दर्जाचा फील अनुभवता आला. एकप्रकारे ही परिषद नांदेडच्या विभागीय आयुक्तालयाची नांदी असल्याचे म्हटले जात आहे.नांदेड, परभणी,लातूर आणि हिंगोली या चार जिल्ह्यांसाठीची लोकशाही, निवडणूक व सुशासन या विषयावरील परिषद नांदेडमध्ये पार पडली. या परिषदेला चार जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बरोबरच विभागीयस्तरावरील वरिष्ठ अधिका-यांचीही अवर्जुन उपस्थिती होती. नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन या निमित्ताने गजबजले होते. विशेष म्हणजे एखाद्या मंत्रिमंडळ बैठकीप्रमाणे या परिषदेचे नियोजन होते. अतिशय सुसज्ज असे हे नियोजन भवन पाहून बाहेर जिल्ह्यांतून आलेल्या प्रतिनिधींनीही याचे कौतुक केले. सर्वसामान्य माणसाला विकासकाम व नियोजनात सहभाग देणारा कायदा ७३ व ७४ व्या घटनादुरूस्तीमुळे प्राप्त झाला़ अस्तित्वात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे बळकटीकरण करून प्रत्यक्ष विकासात सहभागी होण्याची संधी या घटनादुरूस्तीमुळे मिळाली. या बाबत दिवसभर मान्यवरांची व्याख्याने झाली. उपस्थितांनीही या चर्चेत सहभाग नोंदवून आपली मते मांडली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सक्षमीकरणास २५ वर्ष पूर्ण होत असताना राज्य निवडणूक विभागाच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यातकेवळ विभागीयस्तरावर परिषदांचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र याला नांदेड अपवाद ठरले. सध्या विभागीय दर्जा नसतानाही नांदेडला या विभागीय परिषदेच्या आयोजनाचा मान मिळाला. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाने काटेकोर नियोजन करुन ही परिषदही सर्वार्थाने यशस्वी ठरविली. ही जबाबदारी पेलताना प्रशासकीय पातळीवर कुठेही कमतरता राहणार नाही याची काळजी घेतली़जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी नांदेड महापालिका, जिल्हा परिषद आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापाठाला समवेत घेवून या विभागीय पातळीवरील परिषदेला यशस्वी केले आहे़आयुक्तालयाचा दावा झाला आणखी मजबूतनांदेडच्या विभागीय आयुक्तालयाचा प्रश्न हा प्रशासकीय पातळीवर प्रलंबित ठेवला असला तरी ७३ व ७४ व्या घटनादुरूस्तीच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या विभागीय परिषदेच्या निमित्ताने नांदेडने आयुक्तालयाचा आपला दावा आणखीणच मजबूत केला आहे़ सर्वांगिणदृष्ट्या योग्य असलेल्या नांदेडचे आयुक्तालय कार्यान्वयीत करण्याचा प्रश्न राजकीय वादात अधांतरी राहिला असला तरी प्रत्यक्षात नांदेड जिल्ह्याने विभागाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे़ आता जिल्ह्यातील सर्वपक्षीय राजकीय मंडळींनी पुढाकार घेण्याची गरज आहे.