शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड परिमंडळातील ९८ वीजबिल केंद्रांना टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:31 IST

आॅनलाईल सुविधा उपलब्ध नसल्याच्या कारणावरुन नांदेड परिमंडळातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने चालविण्यात येणारी ९८ वीजबिल भरणा केंद्र बंद करण्यात आली आहेत, परंतु महावितरणच्या वतीने इतर ठिकाणी नांदेड परिमंडळात १२५५ वीजबिल भरणा केंद्र उपलब्ध करून दिली आहेत.

ठळक मुद्दे महावितरण: आॅनलाईन सुविधा उपलब्ध नसल्याने ओढवली नामुष्की

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : आॅनलाईल सुविधा उपलब्ध नसल्याच्या कारणावरुन नांदेड परिमंडळातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने चालविण्यात येणारी ९८ वीजबिल भरणा केंद्र बंद करण्यात आली आहेत, परंतु महावितरणच्या वतीने इतर ठिकाणी नांदेड परिमंडळात १२५५ वीजबिल भरणा केंद्र उपलब्ध करून दिली आहेत.ग्राहकाभिमुख सेवेसाठी सदैव प्रयत्नरत असलेल्या महावितरणने आपली सर्व वीजबिल भरणा केंद्र आॅनलाईन केली आहेत. त्यामुळे आता वीजग्राहकांना कोणत्याही भरणा केंद्र्रावर जावून वीजबिल भरता येणार आहे. दरमहा वीजबिल भरता येणार आहे. वीजबिल भरल्यानंतर तात्काळ केंद्राकडून वीजबिल भरल्याची पावती दिली जाणार आहे. सदरील केंद्र्रावर वीजबिल भरण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्मार्ट फोनधारकांनी महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे बिलाचा भरणा करावा. या पर्यायांच्या माध्यमातून ग्राहकांनी वीजबिल नियमित भरावे, असे आवाहन नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता अविनाश पाटोळे यांनी केले आहे. नव्याने सुरू केलेली वीजबिल भरणा केंद्र त्वरित सुरू करण्याच्या दृष्टीने नांदेड परिमंडळाचे वित्त व लेखा विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक मधुकर सावंतराव, अविनाश डमरे यांनी परिश्रम घेतले.परिमंडळात १२५५ केंद्रांवर सेवा उपलब्धनांदेड परिमंडळातील वीजग्राहकांसाठी १२५५ वीजबिल भरणा केंद्राची सोय उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील ४६९, परभणी जिल्ह्यातील ५१२ तर हिंगोली जिल्ह्यातील २७४ भरणा केंद्रांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यात ४१३ वकरांगी केंद्र, खाजगी पतसंस्थांची ३४ केंद्र त्याचबरोबर महावितरण संचलित २२ वीजबिल भरणा केंद्र, परभणी जिल्ह्यात १६० ग्रामपंचायतींची महाआॅनलाईन केंद्र, २९७ वकरांगी केंद्र, बुलढाणा अर्बन को-आॅपरेटीव्ह बँकेची १४ खाजगी पतसंस्थांची ११, महावितरण संचलित ३० वीजबिल भरणा केंद्रांचा समावेश आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यात २४६ वकरांगी केंद्र, बुलढाणा अर्बन को-आॅपरेटीव्ह बँकेची ९, खाजगी पतसंस्थांची ८ आणि महावितरण संचलित ११ वीजबिल भरणा केंद्रांतून वीज ग्राहकांना सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.