शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कार्यालयांत आचारसंहिता नावालाच; काम कमी अन् कर्मचाऱ्यांच्या कानाला मोबाईल जास्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:08 IST

नांदेड : आजकाल सर्वांच्याच हातात ॲन्ड्राईड मोबाईल आले आहेत. सोशल मीडियावरही अनेकजण ॲक्टिव्ह आहेत. त्यांत सरकारी कार्यालयांत काम करणारे ...

नांदेड : आजकाल सर्वांच्याच हातात ॲन्ड्राईड मोबाईल आले आहेत. सोशल मीडियावरही अनेकजण ॲक्टिव्ह आहेत. त्यांत सरकारी कार्यालयांत काम करणारे अधिकारी आणि कर्मचारीही आले; परंतु कार्यालयात असताना अनेक अधिकारी आणि कर्मचारी लोकांची कामे करण्यापेक्षा तासन‌्तास मोबाईलमध्ये व्यस्त असतात. अनेकजण तर व्हिडिओ कॉलवर असल्याचे दिसून आले. त्यामुळे कार्यालयीन शिस्तीचा भंग होत आहे.

कार्यालयीन कामासाठी केवळ कार्यालयीन दूरध्वनीचा वापर करावा. कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामासाठी आवश्यक तेव्हाच मोबाईलचा वापर करावा. मोबाईलवर सौम्य आवाजात बोलावे, वाद घालू नये. कार्यालयीन कामासाठी मोबाईलचा वापर करताना टेक्स्ट मेसेजचा वापर करावा. मोबाईलवर आलेले अत्यावश्यक वैयक्तिक कॉल बाहेर जाऊन घ्यावेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोणत्याही विभागात गेल्यानंतर अनेकांच्या माना या मोबाईलमध्येच असल्याचे दिसून येते. टेबलवर फाइलींचा गठ्ठा पडलेला असताना त्याकडे त्यांचे लक्षही जात नाही. कामासाठी आलेली व्यक्ती समोर असताना त्याच्याशी बोलणेही टाळले जाते.

जिल्हा परिषदेत पुरुष आणि महिला कर्मचारी आपली खुर्ची सोडून पोर्चमध्ये उभे राहत मोबाईलवर बोलण्यात व्यस्त असतात. तसेच त्यांचा अधिक वेळ कँटीनमध्येच जातो. या ठिकाणीही सोशल मीडियावर चॅटिंगमध्ये वेळ घालण्यात येतो. त्यामुळे खुर्ची रिकामी दिसल्याने कामासाठी आलेले नागरिक परत जातात.