या पार्श्वभूमीवर येथील सरपंच , उपसरपंच व ग्रामसेवक यांनी शिवजयंतीच्या पूर्व संध्येला महिला वर्गाची बैठक बोलावून या उपक्रमाला सुरुवात केली. आपले घर व परिसरातील स्वछते विषयी सूचना देण्यात आल्या. तर शिवजयंती दिवशी ३९१ वृक्ष लागवड करून त्या वृक्षांना कुटूंबातील मुलींचे नावे देण्यात आले. ग्रा. पं. नमुना नंबर ८ उताऱ्याला पती पत्नीच्या नावाने नोंद घेण्यात आलेली आहे. गावातील संपूर्ण परिसर स्वच्छ व नीटनेटका करून प्रत्येक घरास एकाच रंगात रंगविण्यात येणार आहे. तसेच शाळकरी मुलांसाठी गावातील सर्व भिंती बोलक्या करून त्यावर गणिताचे सूत्र , म्हणी , वाक्प्रचार इत्यादी लिहिण्याचे काम चालू आहे. तसेच प्रत्येक घरावर घरातील महिलांची नावे रेखाटण्यात येणार आहेत. त्याचबरोबर ग्रा. पं. च्या आवारात घनदाट लघुअरण्याची निर्मीती करण्यात आलेली आहे. २२ जानेवारी ते २० मार्च या कालावधीत हस्सा येथे हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत येथील कर्तव्यदक्ष ग्रामसेवक सचीन सोनुने यांनी गाव स्वच्छ व सुंदर करण्याचा विडा उचलेला आहे. याकामी त्यांना गावातील सरपंच सुनीता संदलवाड, उपसरपंच गोविंदराव पाटील जाधव, व ग्रामपंचायत कार्यकारणी व गावकरी महिला पुरुष युवक व युवतींनी परिश्रम घेतले.
माझा गाव सुंदर गाव अभियानाअंतर्गत हस्सा गाव होणार सुंदरग्राम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:34 IST