शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

म्युकरमायकोसिस परतीच्या मार्गाला; ४ जणांचे डोळे काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:25 IST

नांदेड : कोरोनापश्चात, तसेच अनियंत्रित रक्तशर्करा असलेले व स्टेरॉईड्स आणि इतर औषधांचा वापर झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस हा आजार आढळून ...

नांदेड : कोरोनापश्चात, तसेच अनियंत्रित रक्तशर्करा असलेले व स्टेरॉईड्स आणि इतर औषधांचा वापर झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस हा आजार आढळून येत आहे. डॉ. श.च.वै.म. रुग्णालय येथे एप्रिलच्या अखेरपासून या आजाराची लक्षणे असलेले रुग्ण आढळून येत आहेत. आतापर्यंत १८८ रुग्णांना म्युकरमायकोसिस हा आजार झाला होता. शासकीय रुग्णालयात १८८ रुग्णांपैकी ११८ रुग्णांवर विविध शस्त्रक्रिया कराव्या लागल्या होत्या. त्यात अनेकांच्या डोळ्याला बाधा झाली होती.

यामध्ये सर्व रुग्णांवर नाकातून दुर्बिणीद्वारे (एन्डोस्कोपी) शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यापैकी ३४ रुग्णांमध्ये चेहऱ्याच्या वरच्या जबड्याची शस्त्रक्रिया करून कमी-जास्त प्रमाणात वरचा जबडा काढावा लागला, तसेच आतापर्यंत ९२ रुग्णांना डोळ्याच्या म्युकरमायकोसिसची बाधा झालेली आहे. कोरोनातून ठणठणीत बरे झालेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस होण्याचा धोका अधिक असतो. नांदेडात या आजाराचे रुग्ण आता बरे झाले आहेत, तर अनेक रुग्णांनी हैदराबाद आणि औरंगाबाद येथे धाव घेतली होती. आता मात्र कोरोनाप्रमाणेच म्युकरमायकोसिसचे रुग्ण घटले आहेत.

औषधींचा पुरेसा साठा कधी उपलब्ध

विष्णूपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यासाठी या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक कार्यरत आहेत. कान, नाक व घसातज्ज्ञांकडून म्युकरच्या अनेक रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. ॲटीफंगल, तसेच इतर सर्वच प्रकारची औषधी या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यामुळे औषधांचा तुटवडा सध्या तरी नाही.

४ जणांचा एक डोळा निकामी

रुग्णालयातील नेत्ररोगतज्ज्ञांनी डोळ्याची तपासणी करून या रुग्णामध्ये बुरशीनाशक औषध (एम्फोटेरिसीन बी) हे इंजेक्शन डोळ्यामागे देऊन रुग्णाचा डोळा वाचविला, तसेच ४ रुग्णांमध्ये पूर्ण डोळा शस्त्रक्रिया करून काढण्याची वेळ आली. सध्या ३४ ‌रुग्ण उपचाराखाली आहेत. त्यांच्यावर कान, नाक, घसा या विभागात तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. त्यातील अनेकांची प्रकृती आता ठणठणीत होत आहे; परंतु शस्त्रक्रिया केल्यामुळे विश्रांतीची गरज आहे.